The ginger herb increases perspiration improves digestion and liver function controls vomiting and coughing it stimulates circulation, relaxes spasms and relieves pain
ही कंद वनस्पती असून यास अद्रक असेही म्हणतात. यालाच वाळवून सुंठ तयार केली जाते. जेवणाच्या आधी आल्याचा तुकडा जर मीठ लावून खाल्ला तर आपल्याला भूक सुद्धा चांगली लागते, जीभ स्वच्ह होते, रुची येते व पचनास मदत होते. थंडीतील खोकला, कफ, ताप, सर्दी, यामध्ये आल्याचा रस व मध असे मिश्रण घ्यावे व कपाळ, नाक यावर सुंठीचा लेप घालावा. सुंठ हे आम्लपितावरील उत्तम औषध आहे. सुंठ पावडर+खडीसाखर हे मिश्रण त्याकरिता उपयुक्त ठरते. अजीर्ण ,पोट फुगणे, गॅसेस होणे यावर आल्याचा रस बेंबीत टाकावा. लक्षणे कमी होऊन भूकही सुधारते. सुंठ/आले हे सर्व प्रकारच्या वातव्याधींवरचे उत्तम औषधे आहे. आमवात, संधिवात यामध्ये आल्याचा रस अथवा सुंठ गरम पाण्यातून लावल्यास सांधे मोकळे होतात.