Eggs Vegetable Pulao :
The most easiest, delicious and flavorful biryani that one can make at home with very few ingredients. When you have short time this is the best recipe to prepare. This recipe doesn’t need garam masala.

साहित्य – दोन वाट्या दिल्ली राईस, तीन अंडी, पाव वाटी गाजराचे काप, ८ ते १० घेवड्याचे तुकडे, कोबीचे फ्लावर तुकडे तळलेले एक वाटी बटाटे काप तळलेले पाव वाटी, तूप, मीठ.
मसाल्याचे साहित्य – दालचिनीचे तुकडे दोन, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे धने पूड, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा आले-लसून पेस्ट, बारीक च्रलेली कोथिंबीर, चार हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा उभा चिरलेला.
कृती-: प्रथम तांदूळ धुवून ठेवावे व त्यात दोन ते तीन लवंगा व दालचिनीचे तुकडे, व चवीनुसार मीठ घालून त्याचा मोकळा भात शिजवून घ्यावा. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करून त्यात गाजर व घेवड्याचे तुकडे टाकून परतावे, त्यावरच फ्लावर तुकडे, बटाटे तुकडे, व सर्व मसाला व चवीनुसार मीठ घालून परतावे, ह्या सर्व परतलेल्या भाज्या कडून ठेवाव्या.
पातेल्यात उरलेले तूप घालून गरम करावे, त्यात कांदा गुलाबीसर परतून घ्यावा, त्यात अंडी फोडून मोकळी करावी, नंतर सर्व भाज्या व शिजलेला भात टाका व चांगला मिक्स करा. चिरलेलि कोथिंबीर टाका नंतर हे पातेले तवा गरम करून त्यावर ठेवून थोडी वाफ येऊ द्यावी. पुलाव गरम सर्व्ह करावा.