Pulao is a yummy main dish that is made with rice .This dahi rice pulao has more than curd and rice. get the ultimate recipe on dahi pulao. Marathi unlimited is a unique souce of a maharastrian recipes.
साहित्य :- दोन वाट्या दिल्ली राईस, अर्धा पाव पालक, एक कप दुध, एक वाटी बारीक चिरलेली मेथी, एक वाटी दही, थोडा बेदाणा, तीन वेलची, पाच लवंगा, दोन तुकडे दालचिनीचे तुकडे, छोटा तुकडा जायफळ पूड, एक तमाल पत्र, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, चार लसून पाकळ्या. एक ईंच आले तुकडा, हिरव्या मिरचीचा ठेचा.
कृती -: दोन तास अगोदर तांदूळ धुवून ठेवावे, दही मधील पाणी काढून घट्ट झाले कि ते एका प्लेट मध्ये चापट थापून ठेवावे, व त्याचे तुकडे पाडावे. मेथी पालक बारीक चिरून थोडी वाफवून घ्यावी, आले लसून पेष्ट करावी, नंतर तुपाची फोडणीत प्रथम कांदा परतून घ्यावा, आलेलसून पेस्ट घालावी फोडणीत सर्व साहित्य मसाले घालून मंद आचेवर शिजू द्यावे त्यात मेथी पालक वै, टाकावी. चवी नुसार मीठ, मिरची तुकडे व तांदूळ टाकावेत व मसाल्यात परतून घ्यावे गरम पाणी धालून भात मोकळा शिजू द्यावा.वरून दह्याचे तुकडे ठेवावे व वाढताना तळलेला कांदा व बेदाणे ठेवावे.