मर्मबंधातली ठेव




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The concept of chakra features in tantric and yogic traditions of Hinduism and …. they are interpretations of mental images that are fed back to the individual

chakra_balancing

 आपले प्राण राहण्याचा शरीरातील मुख्य जागा जिथे असतात तिथे मर्मे असतात.  शरीरसामर्थ्य जरी कमी असेल तरी मर्मज्ञानाचा व्यंवस्थित अभ्यास करून बाल,  तरुण, वृद्ध, स्त्रिया व संकटग्रस्त मुलीही संकटशी प्रभावाने सामना करू शकतील  ह्यही या मर्माना समजून घेण्याच्या अभ्यासामागाचा उदेश उपयोगी ठरावा.
एका प्रसिद्ध मराठी नाट्यगीताची सुरवात मर्मबंधातील ठेव ही अशी असल्याचे  आपल्याला माहिती असेल. त्याला बोलके करायला आता मात्र मी अगदी त्याचा  मर्मावरच आघात केला! नेमके मर्मावर बोट ठेवले की त्याला गडबड करता येणार  नाही. अशा वाक्यप्रचारांचाही वापर आपण बोलताना नेहमी करीत असतो. काय  भानगड आहे मराठीतील ह्या मर्म शब्दाची! याची धावती कथा आपण या छोट्याशा  लेखात थोडी पाहणार आहोत.
मर्म म्हटले की, आपल्या मनांत शरीराचा एखादा नाजूक भाग असे येते आणि ते  खरेही आहे. कसा असतो हा नाजूक भाग!
शरीराच्या आंतररचनेत काही ठिकाणे अशी आहेत की, जिथे स्पंद ठोका – आहे. उदाहरणार्थ, अंगठ्याखालचा मनगटाचा भाग, ह्रदय इ. शरीराचे असे काही भाग की जिथे या स्पंदाला खटकायला होते-तो अडखळ्ण्याची शक्यता असते, त्याची सम गती बिघडण्याची शक्यता असते, तिथे सामान्यत: हि मर्मे असतात. आपले प्राण राहण्याच्या शरीरातील मुख्य जागा जिथे असतात तिथे मर्मे असतात, असे पुरातन महावैद्य सुश्रुत व वाग्भटमुनी आपल्या अष्टांगह्दय या जगप्रसिद्ध ग्रंथात म्हणतात. प्राण्यांचेप्राण राहण्याची प्रमुख स्थाने मर्मापाशी असल्याने साहजिकच त्या शरीरातील नाजूक जागा आहेत .
मुष्टीयोद्धे, कराटा योद्धे, हनुमान-भीम यांसारखे शस्त्राविनाच शत्रूला नामोहरम करणारे योद्धे, अर्जुनासारखे धनुयोद्धे हे सारे मर्मज्ञानाच्या उत्तम अभ्यासाने आपल्या विघेला अधिक प्रभावशाली करणारे ठरले आहेत. गुन्हेगाराच्या तावडीतून सुटण्यास शरीरसामर्थ्य जरी कमी असेल तरी मर्मज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास करून बाल, तरुण, वृद्ध, स्त्रिया व संकटग्रस्त मुलीही संकटांशी प्रभावाने सामना करू शकतील हाही या मर्माना समजून घेण्याचा अभ्यासामागचा उदेश उपयोगी ठरावा. कृष्णासारखा मल व महायोद्वाही अरण्यात एका पारध्याचा बाण पायाला लागून हे जग सोडून निजधामाला गेला. वास्तविक पायाला ईजा ही मृत्यूदायक आहे असे कोणी म्हणणार नाही, पण पायाच्या आंगठ्याच्या ज्या बिंदूवर तो शराघात झाला ते नेमके मर्म असल्याने असे घडले. साप, विंचू, मगर, वाघ, सिंह, अशा प्राण्यांनाही ही मर्मस्थाने आहेत. एवढा मोठा बलवान हती पण माहूत त्याचा गंडस्थळादी मर्माचा उपयोग करूनच त्याला काबूत ठेवतो इतकेच नाही तर युद्धीदी कला किंवा मोठमोठ्या वजनदार वस्तू भूमीवरून, पाण्यामधून इकडून तिकडे करण्यासारख्या विद्या उत्तम रीतीने शिकवू शकतो. तीच गोष्ट घोड्यासारख्या बुद्धिमान प्राण्याबाबत करून अश्वशास्त्रवेते पूर्वकालापासून त्यांस मानवोपयोगी अनेक विद्या शिकवतात.
अशी हि मर्म. त्यांची माहिती उपयोगाची तर आहेत पण आपल्याला आवडणारही ठरेल असे वाटते. ती आपण थोडी पाहू.
आयुर्वेदात विचार केला जातो १०७ मम त्यातील सुमारे ४० विशेष महत्वाची आहेत आणि त्यातील १८ मर्म ही योगशास्त्रातील सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा रोगानाशांसाठी उपयोगात आण्याबाबत याज्ञवल्क्यांनी आपली पत्नी गार्गी हिला सांगितले आहे. (पाहा: योगंयाज्ञवल्क्य) मर्माना इजा वा धका नको
मर्म ही शरीरांतील दोन वेगवेळ्या मांसांच्या संधीत आणि अनेक शिरा ज्या भगत मिळतात अशा सांध्यांपाशी – जंक्शन्सपाशी असतात. मर्मे ह्या विशिष्ट जागा असतात. मांसमर्म, शिरांमधील मर्मे, स्नायूंमधील मर्मे, अस्थींमधील मर्मे व संधीमर्मे, अशा प्रकारांची मर्मे असतात. काही मर्मे तिळाइतकी लहान तर काही तर काही गव्हाएवढी तर काही अर्ध्या अंगुळाइतकी मोठीही असतात. मर्मावर आघात झाला किंवा त्यांना इजा झाली तर बरे न होणारे रोग होतात वा हळूहळू किंवा तत्काळ मृत्युही ओढवतो. म्हणूनच मर्मावर वार केला -मर्मावर आघात केला असा वाक्यप्रचार रूढ आहे. वरील ग्रंथात मर्माना नावे दिले आहेत उदा. पायाच्या अंगठ्याच्या टोकाचे ते क्षिप्र, त्याच्या वेधाने मृत्यू ओढवतो. तळहात किंवा तळपायाच्या मधे तलहृद् त्यावरील आघातानेही मृत्यू ओढवतो. गुद या आतड्याच्या खालच्या टोकापासले मर्म, बस्ति हे मुत्राश्यातील मर्म, ह्दय हे मर्म, कानाशिलांपासली मर्म, जीभ-डोळे -नाक- कान यांकडून टाळयाकडे येणार्या शिरा मिळतात तेथील मर्म मस्तकांत रोमावर्त प्रकाराने हजारो शिरा एकत्र येतात तिथेल मर्म. या सर्व मर्मावरील आघाताने थेट मृत्यू येतो. कानाच्या मागील खालच्या भागाकडे विधुर नांवाचे मर्म. त्यावरील आघाताने बहिरेपण येते. भूवयांच्या शेवटच्या टोकाखाली असलेल्या अपाडवर्त या मर्मावरील आघाताने आंधळेपणा येते.
मांडीतल्या मर्मवेधाने तेथील रक्तक्षयामुळे सुकून जाते. घोटा वा मनगटाच्या हाडापासल्या मर्माघाताने त्यापुढचा भाग लुळा पडतो. काही मर्माघातांनी वेड लागणे, भ्रम होणे, फिटस येणे असे विकार होतात.
अश्विनीकुमारांनी पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याची तालु यांपर्यत १८ मर्म अशी सांगितली आहेत कि जिथे मन नेउन ते एकाग्र करून रोज १०-१५ मिनिट बसले तर विविध रोग नष्ट होतात, असे सांगितले आहे. ती स्थाने, पायाचा आंगठा, घोटे वा मनगटे, शिस्र व जांघ यांमध्ये, माड्या, गुडघे, खालच्या शिवणीच्या वर दोन बोटे, बेंबी, हदय, कंठकूप, चक्षुमण्डल, नाकाचे मूळ, भ्रूमध्य, कपाळाचा मध्य, मुर्धा अशी आहेत. अशी ही आपल्याच शरीरांतील आपल्याला न दिसणार्या न माहित असलेल्या महत्वाच्या अवयवांची माहिती मिळेविणे कोणास बरे आवडणार नाही !

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा