ध्यानधारणा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Chakra Meditation through Bhuta Shuddhi, a Yoga and Tantra meditation on purifying the five elements in the chakras.Allow the mantra Lam to arise repeatedly in your mind field, silently. Allow it to repeat at its own natural speed. You may find that it comes 5-10 times and wants to pause, or you might find it wants to come continuously.

images25  मानसिक ताणाला केवळ आपले मनच नाही तर शरीरही प्रतिक्रिया देत असते. मनावर ताण  पडल्यामुळे शरीरात विविध रसायने व मुख्यत: काही संप्रेरकांची निमित होत असते.    मुत्रपिंडाच्या वर असलेल्या अँड्रिनल ग्रंथीमधून स्टेरॉइड हे संप्रेरक मुख्यत: अधिक प्रमाणात  निर्माण होते. मानसिकताण जेव्हा वाढतो तेव्हा कॉर्टिसोन म्हणजे स्टीरॉईडची निर्मिती  वाढल्यामुळे शरीरातील चयापचय क्रियेवर प्रतिकूल परिणाम होते. कॉर्टिसोनमुळे यकृतातील  ग्लुकॅगोन या  साखर निर्माण करणाऱ्या संप्रेरकावर परिणाम होतो आणि साखरेपासूनच  शरीराला शक्ती मिळत असल्यामुळे हि शक्ती कमी व्हायला लागते. यानंतर हे कॉर्टिसोन    शरीरातील  प्रथिनाचाही अधिक प्रमाणात तान पडल्यामुळे शरीरातील मुख्य घटकांचा  उपयोग अधिक प्रमाणात केला जातो आणि त्यांचे शरीरातील प्रमाण कमी झाल्यामुळे  शरीराची अवस्था वाईट होते.

  एखादा माणूस जर उपोषण करू लागला तर त्याच्या शरीरातील साखर आणि प्रथिने यांचा  साठा वापरून टाकला जातो. शरीरातील स्नायूमध्ये जी काही साखर आणि प्रथिने असतात  त्यांचाही शरीर वापर करते आणि शरीरात जी काय थोडीफार उर्जा साठून असते, तो साठाही  खलास होतो आणि त्यामुळे शरीरच झीज होते. मानसिक ताण पडल्यामुळेही शरीरातल्या चयापचय क्रियेवर विलक्षण तान पडतो आणि या माणसांच्या शरीराची झीज लवकर होऊ लागते याचाच अर्थ ते म्हातारे लवकर होऊ लागतात. हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
प्रत्येक व्यक्ती जन्माला येते तेव्हा ती साधारपणपणे किती जगेल हे नियती ठरवते असे आपण मानतो. पण त्याचबरोबर त्या व्यक्तीचे पोषण कसे होत आहे. ती कोणत्या वातावरणात वाढत आहे. यालाही फार महत्व आहे. मृत्यू हा अनिश्चित असला तरी तो अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जन्माला आलेला माणूस त्याच्या स्वत:च्या आयुष्यमर्यादेप्रमाणे मृत पावणार हे सत्य असेल तरी प्रत्येक माणूस म्हातारा होऊनच मरेल हे सांगता येणार नाही.

प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांकडून काही घेऊन आलेला असतो. शरीर प्रकृती व शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असणे हेही आनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्याचबरोबर काही आजारही खानदानी असतात. ते टाळू म्हटले तरी तुम्ही टाळू शकणार नाही. वय वाढले कि स्नायुंतील ताकद कमी होणार, रक्तदाब वाढणार, रक्तातील साखर वाढणार, हाडातील कॅल्शियम कमी होऊन त्यामधील ताकद कमी होणार.शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होणार. त्वचा शुष्क व कोरडी होणार. रक्त वाहिन्या आकुंचन  पावणार. प्रतिकारशक्ती कमी होणार आणि हळूहळू मेंदूची ही कार्यक्षमता कमी होणार हे जरी खरे असेल तरी सतत मानसिक दबावाखाली एखादी व्यक्ती राहत असेल तर त्याच्या नकळतपणे स्टिरॉइड या संप्रेरकाची निर्मिती किती प्रमाणात व्हावी यावर तिचे नियंत्रण राहत नाही. परिणामी, शरीरात निर्माण होणारे स्टिरॉइड स्लो पायझानिगप्रमाणे शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम करत राहते. या विषारी परिणामामुळे हळूहळू शरीर पोखरले जाते.

त्यामुळे एखाद्या मानसिक धका बसून त्यातून लवकर सावरला गेला तर त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम कमी होतो. पण सततचा मानसिक तन हे विष आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
मानसिक ताणामुळे उत्पन होणार्या परीणाम यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. यासाठी प्रत्येकाने ध्यानधारण केली पाहिजे. रोज १०-२० मिनिटे डोळे मिटून शांत बसून शरीर व मन दोन्ही शिथिल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोनची निर्मिती कानी होते आणि मानसिक ताणाशी मिळतेजुळते घेण्याची क्षमता वाढू शकते. यासाठी नियमित ध्यानधारणा केल्यामुळे केवळ आत्म्यालाच शांती मिळेल असे नाही तर शरीराचा समतोल साधला जाण्याशी मदत होईल. ध्यानधारणा केल्यामुळे  शरीर व मन शांत होतेच पण श्वास, हृदयाचे ठोके व रक्ताभिसरणही नियंत्रणात राहते आणि त्यामुळे मन स्थिर राहण्यास आणि आत्मिक शांती लाभण्यास मदत होते. भावातीत ध्यान करण्यामुळे अधिक फायदा होतो असे लक्षात आले आहे.

ध्यानधारणेचा एंजिग प्रोसेवरही परिणाम होतो. वय वाढत जाईल तसे रक्तदाब वाढणे, दृष्टी मंदावणे व ऎकायला कमी येणे हे बदल अपेक्षित असतात पण भावातीत ध्यान करण्यामुळे मंदावते आणि भावातील ध्यान नियमित करणारी व्यक्ती ही त्याच वयाच्या भावातील ध्यान न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ५ वर्षांनी तरी तरुण दिसते. इतकेच नव्हे तर नियमितपणे भावातील ध्यान केले तर रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयविकार होत नाही. भावातील ध्यान केल्यामुळे मानसिक तान नियंत्रणात राहण्यास मदत होते, मन स्थिर राहते, त्यामुळे तुमच्या शरीराची झीजही लवकर होत नाही, पर्यायाने तुम्ही म्हातारे लवकर होत नाही . शरीर व मनाने कायम तरून राहण्यासाठी ध्यानधारणा करण्यास फार महत्व आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu