All the ways to look younger naturally Best Natural Beauty Tips, with organic beauty products, health and beauty advice, at-home beauty recipes, makeup tips, and hair tips.
सौंदर्य हा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय आपण सुंदर दिसाव अस प्रत्येकालाच वाटत असत. सौंदर्याचा विचार करतांना त्वचा, त्वचेचा रंग, उंची, केस, चेहरा, शरीराचा बांधा इ. घटकांना महत्वाचे स्थान असते. पण शरीराच्या एकूण सौंदर्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या घटकांपैकी चेहऱ्या पाठोपाठ त्वचेचा क्रमांक लागतो. चेहऱ्याची त्वचा, तुकतुकीत, तजेलदार असण. त्वचेचा वर्ण चांगला असणे हे सौंदर्याच म्हत्वाच लक्षण आहे. त्यामुळे सौंदर्याच्या जोपासनेमध्ये त्वचा या घटकाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्वचा केवळ सौंदर्याच्याच दृष्टीकोनातून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने हि अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्वचा हा स्वास्थ्याचे प्रतिबिंब म्हणजे निरोगी त्वचा शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य उमटवणारे हे एक अद्धितीय माध्यम. सुंदर, कांतिमान त्वचा असावी, वर्ण नितळ असावा अशी सर्वाचीच इच्छा असते. पण अनेकवेळा त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा त्वचेच योग्यप्रकारे पोषण न झाल्यामुळे हि साधी अपेक्षा साध्य होत नाही. त्वचेसाठी बाजारात अनेक प्रकारची औषधी मिळतात. पण खरच अशा प्रसाधनांनी सौंदर्य वाढते किंवा टिकते का ?
केवळ यांच्या जाहिरातबाजीला भुलून आपण यांच्या आहारी जाव कि नाही याचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे. एखाद्या व्क्तीच्या त्वचेची नैसगिक स्थिती व्यवस्थित राहावी यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आयुर्वेदाने दिली आहेत, जर आपण या तत्वाचे नियमित पालन केले तर महागड्या क्रीम व लोशनची आपल्याला गरजच पडणार नाही.
आयुर्वेदानुसार त्वचा विकारांचे प्रमुख कारण आहे. चुकीची आहारपद्धती व चुकीची जीवनशैली, जी आपण नकळत आपल्या जीवनात अवलंबत असतो. त्वचा विकार होण्याची विविध कारणे आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत. जसे अधिक प्रमानात द्रव व स्निग्ध पदार्थ खाणे, विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्रित करून खाणे जसे शिकरण, फ्रुट सॅलड, दही, घालून भाज्या करणे इ अति जड पदार्थ खाणे, नवीन धान्य खाणे, दही, मीठ, मासे यांचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे मल, मुत्र, वेगांचे धारण करणे, भोजनानंतर लगेच व्यायाम करणे, सतत उन्हात भटकणे, उन्हातून आल्यावर श्रम केल्यावर लगेच थंड पाण्याने स्नान करणे इ. कारणांमुळे शरीरात दोषांचा प्रकोप होतो व त्यामुळे त्वचा, रक्त, मांस यांच्या ठिकाणी दृष्टी निर्माण होते व त्वचाविकार निर्माण होतात.
तसेच हली तरुण- तरुणींना कॉलेज, क्लास, नोकरी इ. गोष्टीमुळे सतत बाहेर राहावे लागते, त्यामुळे बाहेरचे चमचम, तेलकट, मसालेदार पदार्थ खाले जातात. यामुळे तसेच वेळी- अवेळी जेवण करणे, रात्री जागरण करणे, चायनीज, पावभाजी, मिसळ इ. विषारी पदार्थ खाणे, सतत चिंता वायू प्रदूषण, अळी असणे व्यायामाचा अभाव इ. कारणांनी सुद्धा तारुण्यपिटिका डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे यांचे प्रमाण वाढेल आहे. आपल्या आरोग्यात बिघाड होऊ लागला की सर्वप्रथम त्यांच्या परिणाम त्वचेवर विशेषत: चेहऱ्यावरील त्वचेवर एक प्रकारचे तेज येते, आजारपणात किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडेल तरी लगेच त्वचा निस्तेज दिसते.
सौंदर्याच्या निगडीत त्वचेच्या समस्या विषयी समजावून घ्यायचे झाल्यास त्यात २ प्रमुख प्रकार आढळतात…….
पहिला प्रकार म्हणजे – त्वचेचे गंभीर आजार:-
उदा:- विविध प्रकारचे त्वचा रोग विशेषत इसब, सोरीयासीस इ यामध्ये त्वचा दिसायला खराब दिसते. याअर्थी याचा सौंदर्याशी संबंध असतो. पण प्रामुख्याने शिरीरिक बिघाड झालेले असतो. त्यामुळे यात फक्त बाह्य उपचार करून चालत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे त्वचेचे किरकोळ आजार जसे त्वचेवर काळे डाग पडणे, बारीक पुरळ पडणे, तारुण्यपिटिका इ. हे त्वचेचे किरकोळ आजार आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली, आहार-विहार किंवा सर्वसाधारण उपाय यामुळे टाळू शकतो. रोजच्या जीवनात आपण जर खालील जीवनशैली,आत्मसात केली तर नक्किच त्वचेचे सौंदर्य वाढेल.
अभ्यंग :- अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावून चांगल मालिश करण होय, यामुळे त्वचेखालच रक्तभिसरन सुधारत त्वचा मऊ होते व त्वचेचे वर्ण सुधारतो, त्यामुळे रोज स्नानापूर्वी संपूर्ण अंगाला जरी शक्य नसेल तरी हात पाय व चेहऱ्याला तेल जरूर लावावे. आयुर्वेदाने ऋतूनुसार तेल वापरण्यास सांगितले आहे, जसे हेमंत, शिशिर ऋतूत, तीळ तैल, शरद ग्रीष्म ऋतूत खोबरेल तेल इ..
उटन:-दिवाळीत आपल्याकडे उट्न व तेल लावण्याची पद्धत आहे. उटन चोळल्यामुळे त्वचेचा सैलपणा जाऊन त्वचा घटट होते. त्वचेचा वर्ण सुधारतो व त्वचा नितळ होते. त्यामुळे फक्त दिवाळीतच उट्न न लावता साबणाएैवजी रोज त्रिफळा चूर्ण, डाळीचे पीठ+हळद जर लावले तर त्वचा नक्कीच तजेलदार होईल.
नस्य :- रोज जर नाकात, तेल किंवा तुपाचे २-२ थेंब टाकले तर चेहऱ्यांची त्वचा नक्कीच उजळेल..
मुखलेप: -चेहऱ्यावर विविध प्रकारचे लेप लावणे त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारीनुसार आयुर्वेदात अनेक प्रकारचे लेप सांगितले आहेत. यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो त्वचा मऊ व तजेलदार होते.
उदा:- रुक्ष त्वचेसाठी : शतावरी + जेष्ठमध + अनंतमूळ + गुलाब + वाळा + नागरमोथा + हळद यांचे चूर्ण एकत्र करून दुधात मिसळून त्याचा लेप लावणे…
त्व्चाविकारासाठी व्यवहारात उपयुक्त सर्वसाधारपणे लेप, उपाय खालीलप्रमाणे-
१)तारुण्यपिटिका (pimples):-
१) लोध्र + वेखंड + धने चूर्ण एकत्र करून दुधात लावणे
२) चंदन + अनंता + मंजिष्ठा + मुलतानी माती + कडूनिब साल चूर्ण + आंबेहळद यात गुलाबपाणी मिसळून लावणे.
३) मुलतानी माती + श्वेतचंदन + आवळा + जेष्ठमध + मंजिष्ठा चूर्ण गुलाबपाण्यात मिसळून लावणे.
४) त्रिफळा चूर्ण + जेष्ठमध + अनंता + मलतानी माती एकत्र करून दुधात लेप लावणे
५) अर्जुन + गोरखमुंडी + निम + अनंता चूर्ण एकत्रित करून लावणे.
२) काळे डाग __
१) जायफळा + हळकुंड दुधात उगाळून लावणे.
२) रक्तचंदन उगाळून लेप लावणे
३) मुलतानी माती व चंदन पावडर एकत्र करून दुधात लावणे.
४) अनंतमूळ साल दुधात उगाळून लावरे.
३) त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी ——-
१) मसूर डाळीचे पीठ दुध व सायीत मिसळून लावणे.
२)चंदन + गुलाब + हळद + पपया + निम पावडरी मुलतानी मातीत एकत्र करून लावणे.
३) चंदन + सारिवा + मंजिष्ठा + खस + आंबेहळद + मसूरडाळ पावडर दुधात एकत्र करून लावणे.
४) चंदन + हळद + काकडी जेल + बदाम तेल + गुलाबपाणी एकत्रित लावणे
४) त्वचा होण्यासाठी
१) पपई +संत्रासाल + आवळा + कोरफड चूर्ण एकत्र करून लावणे
२) आठवड्यातून १ वेळा लिंबू साल किंवा टोमटो चेहऱ्यावर चोळणे
३) त्वचा जर तेलकट असेल तर त्रिफळा चूर्ण वापरून चेहरा धुवावा.
५) डोळ्याखाली काळी वर्तुळे :-
१) चंदन + जायफळा + हळकुंड दुधात उगाळून डोळ्याखाली लावणे.
२) झोपतांना डोळ्यावर गायीच्या गार दुधाच्या पट्या ठेवाव्या
३) काकडी व बटाट्याचे काप डोळ्यांवर ठेवणे.
४) गुलाबजालात भिजवून कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवणे.
६) चेहऱ्यावरील सुरकुत्या
१) मंजिष्ठा + पपई + कोरफड + नागरमोथा + एकत्रित लावणे.
२) मध व साय हे मिश्रण घोटून चेहरा चोळणे.
३) कुंकूमदि तेल चेहऱ्याला लावून हळुवार चोलावे.
७)जेवणात काडी, टोमटो, बीट, मुळा ई. सॅलडचा अंतर्भाव करावा.
८) ताजा, गरम, सकस आहार घ्यावा, नियमितवेळी जेवण घेणे.
९)जेवणामध्ये चाकवत, पडवळ, घोसाळी, कारले, टाकळा या भाज्यांच्या समावेश करावा.
१०) जेवणात दही, लसुन, मुळा, साबुदाणा, ऊस, गुळ, काकडी, तीळ हे पदार्थ टाळणे.
११) दुधामध्ये ओली हळद उकळून घेणे.
१२) जुने धान्य वापरावे
१३) चेहरा वारंवार गार पाण्याने धुवावा
१४) आठवड्यातून १ वेळा चेहऱ्यावर गरम पाण्याची घ्यावी.
१५) उन्हात जास्त फिरू नये, जागरण करू नये, दुपारी झोपू नये.