अन्न हे पूर्ण ब्रम्ह !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
91

Anna He poorna bramha. Food blog specializing in Indian cuisine. Annapurna is the Goddess of food. She herself is the mother Parvati, wife of Lord Shiva. According to Indian mythology she supplies food to humanity. Food is god and we have to pray every day befor taking your meal.

लग्न … अन्न ….  टाळा अन्नाची नासाडी

Anna He Purna Bramha
Anna He Purna Bramha

 लग्न कार्यातील  जेवणात उगाचच जास्त मेनू  ठेवण्या पेक्षा मोजकेच पण स्वादिष्ट पदार्थ  ठेवल्यास जेवणात जास्त रंगत येवू शकते. जास्त  पदार्थ दिसल्यास, लोक सर्वच पदार्थ त्या छोट्याशा  ताटात कोंबण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातच  एकात एक पदार्थ मिसळल्या गेल्याने एकाचीही  चवी कळतं नाही. व सर्व अन्नाची एकत्रित चव  चांगली वाटत नाही. आणि मुख्यत्वे उभ्याने जेवण  म्हटले कि हाताला अन्नाचे ओझे पेलेनासे होते  यासर्व प्रकाराने जेवणाची मज्जाच कमी होते. व  शेवटी ते सर्व खाणे जीवावर येवून ते संपूर्ण ताटातील अर्धे अन्न सुद्धा खाणे होत नाही. बाकी अन्न शेवटी कचरा पेटीत जाते.

आजकाल लग्न सोहळ्यात बफे पद्धतीने जेवणाची मांडणी केली गेल्याने, येणार्या पाहुण्यांच्या भरजरी वस्त्रांचा विचार केला गेला नसतो. आणि उभे राहून जेवण जेवण्याची म्हणजे एक प्रकारे शिक्षाच आणि, गर्दीत एकमेकांचा धक्का लागून या भरजरी वस्त्रांची वाटच लागायची तेव्हा यावर विचार करूनच जेवणाची मांडणी व्हायला हवी असे सांगावेसे वाटते.

लग्नात बरच अन्न कचरापेटीत वाया जातं म्हणूनच वर-वधू पक्षाच्या दोन्ही कडील मंडळींनी हे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण सारे सुशिक्षित आहातं ! हेच चांगले अन्न खाण्यासाठी आपलेच कोणी तडपत आहेत याची जाणीव असू द्या. याच अन्नातून कित्येकांची आत्मा शांत होवू शकते. अन्नाची कदर करणार्या काही संस्था आहेत त्यांची माहिती काढा एक फोन लावून तुमच्या कडील वाया जाणारे अन्न ते स्वत: येवून घेवून जातात व भुकेल्यांच्या कामी लावू शकतात. त्यात तुम्ही परमार्थ व पुण्याचे काम साधू शकता.तेव्हा वाया जात असलेले अन्न कामी लावां. याच प्रमाणे असे कित्येक खर्च….

उदा -: डेकोरेशन, फटाक्यांची आतिषबाजी, जेवण मंडपातील फळभाज्यांचे डेकोरेट, जेवणातील मेनू आवश्यक तेवढेच असावे इत्यादी तुम्ही कमी करू शकता उगाचच पैशाचा विना कारण होणारा वायफळ खर्च टाळू शकता.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
91




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu