सदैव तरुण.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Always Feel Young Chronological age is not always the best test of how old you really are. Here’s how to feel younger than your age.Weakness is uncommon in young, healthy adults and therefore Schedule a physical examination if you always feel tired or weak

nishka-family-black-and-white-copy

 बर्याचदा वृद्ध माणसांना अशक्तपणा  आलेला असतो, तो म्हातारपणामुळे  म्हणजे शरीर थकल्यामुळे नसतो तर  नैराश्य आल्यामुळे त्यांना मानसिक  अशक्तता आलेली असते म्हणून  म्हातारपण हा तुमच्यात होणारा  बदल आहे. या बदलाची सवय करायला तुम्ही शिकला नाहीत तर म्हातारपण तुम्हाला टोचू लागेल….

संपूर्ण आयुष्यभर प्रत्येक माणूस जगताना तीन स्तरावर नेहमी कार्यरत असतो. त्याचे शरीर, मन व बुद्धी सतत काम करीत असते. या तिन्हीच्या कार्याचा योग्य समन्वय साधला गेला तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म करण्यास आपणास आनंद मिळतो. जीवन अर्थपूर्ण वाटते. त्यातही आपण आयुष्यात ठरविलेली ध्येय पूर्ण झाली असली तर एक वेगळेच समाधान मिळते. संपूर्ण आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असतो. तो समाधान मिळविण्यासाठी. समाधान केव्हा मिळू शकते तर कौटुंबिक जीवन चांगले गेले आहे व जात आहे. वैवाहित जीवन सुखाचे आहे, आयुष्यात एकटेपणा जाणवत नसेल, सोबतीला प्रेमाची माणसे आहेत. नोकरी व व्यवसायात पुरेसा पैसा मिळून समाधानही मिळते आहे. कुठलेही व्यसन नाही. मुलांची शिक्षणे पूर्ण होऊन ती व्यवसायाला लागली आहेत. शारीरिक आजार नाही, व्यसन नाही आणि या सर्वांमुळे मानसिक स्थैर्य प्राप्त झाले तर ती व्यक्ती आपोआप समाधानी होते.
हे जर खरे असेल तर समाधान हे तुमच्या मनात असते. व्यक्ती तितक्या प्रकृती या तत्वाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे  समाधान वेगवेगळे असू शकते. समाधान हे सापेक्ष आहे. मनाची स्थिती कशी आहे, यावर ते अवलंबून आहे. तुमची विवेकबुद्धी सतत कार्यरत राहील, जागृत राहील, तर तुमच्या मनावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल. शरीराची वाढ होऊन झीज व्हायला लागते, पण मन मात्र वृद्धपणीही विकसित होत असते.
मन सतत विकसित होत असते हि जाणीव होणे हाच एजिंग प्रोसेसला थांबविण्यात सर्वात सुलभ मार्ग होय श्वसोच्छवास, हृदयांची पंपिंग हालचाल होत राहणे या सहजक्रिया आहेत, त्याची आपल्याला कधी जाणीव होत नाही. पण खास तंत्राच्या सहायाने भारतातील काही योगी पुरुषांनी या क्रियांवरही नियंत्रण मिळवले होते. म्हणजे शरीरात ज्या क्रिया अनैच्छिकपणे चालू असतात. (श्वसोच्छवास, समतोल राखणे ) यावर आपण आपल्या इच्छेप्रमाणे नियंत्रण मिळू शकतो. हि शक्ती प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होऊ शकते. पण अशी शक्ती आपल्याला प्राप्त होईल याची जाणीव नसल्यामुळे वृद्ध माणूस शक्तिहीन होतो, हि जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारचा व्यायायाम आहे, तो नियमित पणे करण्याचा सराव केला, हा सराव करायला शिकले तर तुमचे मन आणि बुद्धी अधिक सामर्थ्यशाली बनू शकेल.
शरीर आणि मन म्हणजे आपण आहोत हा विचार न करता शरीर म्हणजे आपण आहोत हा विचार केल्यामुळेच तुम्ही वृद्धी झाला असेल तुम्हाला वाटते. देहबुद्धी आत्मबुद्धी अधिक श्रेष्ठ आहे, हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले तत्व आचरणात आणले तर केवळ शरीर वृद्ध झाले म्हणून तुम्ही झालात हे म्हणणे, चुकीचे आहे हे लक्षात येईल.
शरीर जसे प्रत्येक व्यक्तीने जीवनाच्या अखेरीपर्यंत वापरले पाहिजे, त्याप्रमाणे मन हि सतत शेवटपर्यंत वापरत राहिले पाहिजे. या दोन्हीचा वापर केला नाहीत तर तुम्ही अकाली म्हातारे व्हाल. एह गोष्ट कायम लक्षात ठेवा. शरीर व मन तुम्ही वापरलेच नाही तर त्याची झीज अधिक होईल, ” थांबला तो संपला ” हे आणि चालाल तर चालू राहील हे तत्व म्हातारपणीही तितकेच सत्य आहे. तुम्ही तिम्ही निवृत्त झालात तर जीवनातून निवृत्त झाला नाहीत. कामावरून निवृत्त म्हणजे  नैराश्याला आमंत्रण, असेच समजा काम करत राहण्यामुळेच काहीतरी निर्माण होईल. तुम्ही निष्काम झाला तर तुमची विवेकबुद्धी भ्रष्ट झाली आहे असे समजा.
म्हातारे कसे व्हायचे हे सुद्धा शिकले पाहिजे. म्हातारपण अपरिहार्य आहे असे समजून जर कोणीच काहीच हालचाल केली तर तो म्हातारा माणूस म्हातारपणाबरोबरच अशक्त पणा, परावलंबित्व याला आमंत्रण देतो आहे असेच समजा.
प्रत्येक वृद्ध व्यक्तीने आपली जीवनपद्धती कशी आहे याचे सातत्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण बरीशीची वृद्ध माणसे औषधांवरच इतकी अवलंबून राहू लागतात कि औषध हेच जीवन असे त्यांना वाटू लागते. याचा अर्थ वृद्धपणी औषधे घेऊच नयेत असा नव्हे. ब्लडप्रेशर, मधुमेह, हृदय विकार यासारख्या विकारामध्ये औषधे हि नित्यनियमाने घ्यावीच लागतात. त्याची सवय हि करायलाच लागते पण त्याच बरोबर इतर अनावश्यक औषधे टाळता येण्यासारखी असतात. झोपेच्या गोळ्या, शौचास साफ व्हावे म्हणून घेतले जाणारे विरेचक, डोकेदुखीसाठी घेतल्या जाणार्या गोळ्या, अशा प्रकारची औषधे निश्चितपणे टाळता येतात.
बऱ्याच वृद्ध माणसांना अशक्तपणा आलेला असतो, तो म्हातारपणामुळे म्हणजे शरीर थकल्या मुळे नसतो तर नैराश्य आल्यामुळे त्यांना मानसिक अशक्तता आलेली असते म्हणून. नैराश्य येण्याची मुख्य करणे असत्तात ती आपण आता निरुपयोगी झालो आहोत. आता घरात आपली अडगळ वाटणार, आपण आता घरातल्या लोकांनाच नकोसे झालो आहोत. आपण म्हणजे घराला भार आहोत असे वाटणे. या विचारांच्या चक्रातून काही म्हातारी माणसे बाहेर पडूत शकत नाहीत. हा असा सातत्याने मनात विचार येत राहणे याचाच अर्थ म्हातारपणाला तोंड देण्यास तुमची मानसिक तयारी झालेली नाही असाच होतो. म्हातारपण हा तुमच्यात होणारा बदल आहे. या बदलाची सवय करायला तुम्ही शिकला नाहीत तर म्हातारपणा तुम्हाला टोचू लागेल. तेव्हा ‘वृद्ध ‘ कसं व्हायचं हे शिकलात म्हणजे तुम्ही म्हातारे होणार नाही. शारीरिक म्हातारपण हे बदलू शकत नसतो, उलटे फिरवू शकत नसलो तरी मानसिक वृद्धत्व मात्र बदलू शकतो. इतकेच नव्हे तर उलट फिरवूही शकतो.

यासाठी खालील गोष्टी आचरणात आणा.
* तुम्ही तरून आहात असा विचार मनात आणा.
* तुमची बुद्धी अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत स्वावलंबी राहा.
* तुम्ही या वयात केवळ सोपी सोपीच कामे करू शकता असे न समजता नवीनही काही शिकू शकता असाच विचार मनात आणा. असे करण्यामुळे तरून झाल्यासारखे वाटेल आणि म्हातारपण विसरण्यास मदत होईल. या सर्वांची जाणीव होण्यामुळे तुमच्या अंगात शक्ती प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील हेतू बदलून एका निराळ्याच व हेतू पूर्ण जीवन पद्धती तुम्ही आचरण्यास शिकाल आणि मग तुम्ही म्हातारे आहात ही  जाणीवच विसुरून जालं. ही शक्ती तुमच्यात आहे. तिच्या योग्य वापर करावा

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा