मटण ओनियन बिर्याणी …
Like
Like Love Haha Wow Sad Angry

If you are crazy for Non Veg. Mutton and Onion Biryani is one good option for you to cook. Mutton and Onion Biryani is full of spices and Test. Read Full recipe.

Mutton and Onion Biryani

साहित्य – एक किलो मटणाचे तुकडे, एक किलो बासमती तांदूळ, चार कांदे, आले लसून पेस्ट, गरम मसाल्याचे साहित्य जाडसर कुटून, पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, चार टोमटो, सुक खोबर कीस पाव वाटी, मीठ चवीनुसार ,एक लिंबाचा रस, एक वाटी दही, एक वाटी तूप, थोडी काजू आणि मनुका. किंचित रंग

कृती :- मटण स्वच्छ धुवून त्याला हळद,मीठ,हिरव्या मिरचीचा ठेचा,एका कांद्याचा ठेचा, दही या मध्ये मटण घालून दोन ते तीन तास मुरु द्यावे. त्या नंतर एका पातेल्यात तूप टाकून एकदम गरम झाल्यावर त्यात एक कांदा बारीक चिरून घालावा. गुलाबी झाल्यावर त्यात टोमाटो बारीक चिरून घालावा. आणि ते शिजवून नंतर मटण घालावे आणि चांगले शिजवून घ्यावे.नंतर बारीक कीस खोबरे टाकावे. इकडे बासमती तांदूळ धुवून तो तूप गरम करून त्यात परतावा व नंतर त्यात शिजण्या जोगा गरम पाणी व लिंबाचा रस व किंचित मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. नंतर उरलेला दोन कांदे बारीक चिरून गरम तेलात गुलाबीसर तळून काढावा.

दुसर्या एका भांड्यात तूप टाकून त्यावर एक थर मटनाचा टाका आणि त्यावर भाताचा घाला. त्यावर अधे मध्ये किंचित रंग घाला.त्यावर बाकी तळलेला कांदा घालानंतर बारीक चिरून कोथिंबीर पसरा, त्यावर काजूव मनुका ठेवा, व चार चमचे तूप घालावे नंतर झाकण ठेवून मंद आचेवर किंचित वाफ येवू द्यावी. व सर्व्ह करावी .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: