मुलांच्या डोळ्यांची काळजी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

It’s difficult to know if or when your child needs to see an eye care provider. its very important to take care of eye of children. Children’s eye health begins in the newborn nursery and should continue throughout childhood. in this period their eyes may affect with many viral infection. read this article to know about eye care of children.

Eye care of children
Eye care of children

डोळे आणि दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली ही महत्वाची भेट आहे. डोळे आयुष्यभर सुद्रुड राहण्यासाठी त्यांची काळजी घ्यायला हवी. मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताना काय करावे आणि काय करू नये याच्या काही टिप्स.
१) स्वच्छता – तुमच्या बाळाचे डोळे स्वच्छ ठेवा. अनेक अर्भकांमध्ये डोळ्यामध्ये नितळ स्त्राव वाहतो. नंतर तो पिवळ्या किंवा पांढऱ्या स्त्रावात रुपांतरीत होतो. कापसाचा स्वच्छ शक्यतो उकळलेल्या पाण्यात घेऊन बाळाचे डोळे आतून बाहेरून हलक्या हाताने स्वच्छ करा. दिवसातून दोनदा हा व्यायाम करा.
* मालिश – वाहते डोळे असण्याऱ्या मुलांना पिशवीच्या भागात मालीशची गरज असते. डोळ्याच्या कडेला नाकाजवळ  हलका दाब देवून नाकपुडीच्या दिशेने दाबा.एका वेळी १० स्ट्रोक ह्या पद्धतीने दिवसातून ४ वेळा करणे आवश्यक आहे.
*जर तुमच्या मुलाचे डोळे भिरभिरत आहेत nystagmus (अस्थिर नजर) किंवा तिरळेपणा येतोय किंवा तुमच्या मुलांच्या डोळ्यात असामान्य दिसली तर बालनेत्र तज्ञास ताबडतोब भेटा.
*तुमचे बाल अपुरे दिवसाचे असल्यास ते रुग्णालयात असतानाच त्याचे डोळे तपासून घ्या, नंतर एका वर्षांनी, तीन वर्षांनी, पाच वर्षांनी.
*जर तुमचे  बाल सुद्रुड असेल आणि व्यवस्थित बघत असेल आणि व्यवस्थित बघत असेल तर तीन वर्ष वयाला डोळे तपासून घ्या.
* वाचतांना कोलीमध्ये पुरेसा उजेड असल्याची खात्री करा. उजव्या हाताचा वापर करण्यारया व्यक्तीस डावीकडून प्रकाश येणे चांगले.
*रोज ७ – ८ ग्लास पाणी पाजा.

 हे टाळावे.….

 *बाळामध्ये वाढणारा तिरळेपणा दुर्लक्षू नका. तिरळेपणा आपोआप जाईल असे प्रत्येक केसमध्ये गृहीत धरणे चूक आहे.
*तुमचे मुल टीव्ही बघायला नेहमी फार जवळ जात असेल किंवा वाचताना पुस्तक खूप जवळ पकडत असेल तर किंवा लिहितांना खूप वाकत असेल तर दुर्लक्ष करू नका.
*बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नका. अनेकदा जळजळणारे आणि जंतुसंसर्ग निर्माण करणारे असते.
*तुमचे मुल जर सतत डोळा चोकात असेल तर त्याला तसे करण्यापासून थांबवा. अशा मुलांना मातीत खेळू देऊ नका आणि बाहेर जाताना काळा चष्मा घालायला लावा. लवकरात लवकर बालनेत्र तज्ञास दाखवा.
*तुमच्या मुलाला धारदार वस्तूंशी खेळू देऊ नका.मुलांना पेन्सिलसुद्धा हाताळताना सावध राहायला शिकवा. शिशुगटातील मुलांना पेन, टोकदार किल्ला, काचेचे सामान, टेबलाचे टोकदार कोपरे ह्यांपासून दूर ठेवावे. अशा क्षुल्लक  वाटण्याऱ्या वस्तूंना तुमच्या मुलाचा/मुलीचा डोळा जाऊ शकतो. प्रतिबंध हा  एकच मार्ग आहे.
*फटक्यांच्या खूप जवळ जाणे किंवा चेहऱ्याचा खूप जवळ धरणे टाका. चेहऱ्यावर भाजल्याच्या कुरूप खुणा राहतात आणि डोळ्यांना इजा झाल्यास दृष्टी कायमची जाऊ शकते.
*होळी खेळताना सावध राहा. गुलाल आणि होळीचे इतर रंग तीव्र आम्ल गुणधर्माचे असतात आणि बुबुळाला त्यांच्या रासायनिक गुणधर्माने जवळजवळ वितळवतात.
*तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या डोळ्यात काही गेल तर चोळू नका. भरपूर पाण्याने डोळे धुवा. उशीर न करता नेत्रतज्ञास दाखवा.
*डोळ्याच्या  लालीसाठी, जळजळीसाठी डॉक्टरांच्या  सल्लाशिवाय कोणतेही औषध वापरू नका. अशा आंधळे पणाने वापरलेल्या आयड्रोप्समध्ये स्टिरॉ ईडस असतील तर ते डोळ्याला आणखी इजा पोहोचवू शकतात.
*जेव्हाही तुमचा नेत्रतज्ञ स्टिरॉइड्सयुक्त आयड्रोप्सचा सल्ला देईल तेव्हा त्याचे वेळापत्रक बारकाईने पाळा. सांगितलेल्या काळापेक्षा जास्त वापरू नका. स्टिरॉइड्सला अनेक साईड इफेक्ट्स असतात, खास करून बालकामध्ये जे बऱ्याचदा स्टिरॉइड्स प्रतिसादक  असतात.

डोळ्याच्या देखभालीबद्दलचे सर्वसामान्य गैरसमज –

*मुलाने सतत चष्मा वापरल्यास त्याचा नंबर कमी होईल.
*मुल खूप टीव्ही बघते म्हणून त्याला चष्मा आहे.
*मुल कच्च्या भाज्या खाते किंवा गाजराचा रस भरपूर पिते तेव्हा त्याचा नंबर जाईल.
*बाळ इनक्युबेटरमध्ये (काचेची पेटी) होते म्हणून ते तिरळे बघते.
*टीव्हीमधून येणारी किरणे तुमच्या मुलांच्या डोळ्यांना इजा पोहचवितात.
*आईने गर्भारपणात खूप टीव्ही बघितल्यामुळे मुलाला चष्मा लागला.
*डोळ्यावर आणि कपाळावर येणाऱ्या केसांमुळे तिरळेपणा येतो.
*अ जीवनसत्वाच्या गोळ्या डोळ्याची ताकद वाढवितात.
*मोतीबिंदूचा इलाज औषधे व आयड्रोप्सने होऊ शकतो

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा