चिकन दुध बिर्याणी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Chicken Milk Biryani :

Use milk while cooking Biryani, How to use Milk during preparation of Biryani. Check the list of ingredients require for chicken Milk Biryani. Read full recipes for the proper guideline.

chicken Milk biryani
chicken Milk biryani

 साहित्य :- अर्धा किलो चिकन ताजे, अर्धा किलो बासमती तांदूळ तिनं मध्यम आकाराचे कांदे अर्धा इंच आले, पाच पाकळ्या लसून, तीन टोमाटो, अर्धा किलो दही पाणी काढलेले, एक चमचा जिरे, तीन वेलची, एक इंच दालचिनी तुकडा, पाच लवंगा पाच, मिरीचे दाणे, तीन काजू, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पावडर, अर्धा लिटर ताज क्रीम दुध, एक लिटर साधे दुध, थोडे बेदाणे.

कृती;- तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालावेनंतर निथळून घ्यावे. दोन कांद्याचे उभे काप करावे, व तेलात करपून ध्यावे. आणि एक कांदा आले लसून आणि टोमाटो सर्व बारीक चिरून घ्यावे. आणि दह्यात आले-लसून पेस्ट, तिखट-मीठ घालून सर्व एकत्रित मिसळावे व चिकनच्या तुकड्यांना चोळून मुरण्यासाठी अर्धा तास ठेवावे. नंतर तेल तापवून त्यात जिरे, हिरवी वेलची, दालचिनी, मिरी, लवंगा घालून परतावे नंतर कांद्याचे उभे काप घालून ते लालसर होऊ द्यावे व आले लसून बारीक कापून ते घालावे ते झाल्यावर काजूचे तुकडे घालावे या सर्व मसाल्यात टोमाटो चे तुकडे घालावे व गरज असल्यास थोडे पाणी घालून ढवळावे. नंतर धणेपूड जिरेपूड घालून शिजू द्यावे. मिश्रणाच्या कड्याना तेल सुटे पावेत शिजू द्यावे व नंतर चिकन घालावे. व चांगले ढवळावे व थोडे शिजू द्यावे. दुधात क्रीम, आणि केसरच्या दोन काड्या मिसळून त्या चिकनवर ओताव्या नंतर धुवून पाणी निथळलेले तांदूळ घालून निट ढवळावे व थोडे शिजण्या जोगे पाणी घालून पूर्णपणे शिजू द्यावे. जेवताना वाढताना त्यावर बेदाणे व परतलेला कांदा त्यावर पसरावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu