१०८ जीवनदायी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
104

108 Ambulance Jiwandani: The Maharashtra Emergency Medical Service with 108 Ambulance which is a specialized service where emergency healthcare needs are addressed through well defined care processes..

108 Ambulance
108 Ambulance

एकशे आठ राज्यात हा इमर्जन्सी रुग्णांसाठी भाग्यांक आहे. जीवन गुंगागुंतीचे गतिमान झाले आहे. शहरे अस्थाव्यस्थ वाढली आहे. वाहनांची संख्या, प्रकार आणी गती वाढली आहे. रस्ते अपुरे आहे याचा परिणाम म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात. जेवढे लोक युद्धात आणी आघाडीवर मरीत नाहीत. तेवढे रस्त्यावरच्या अपघातात मरतात. दवाखान्यातला मृत्यूंचे प्रमाणही त्यापेक्षा कमी आहे. अपघात अचानक होतात. अनोळखी व्यक्ती असते. आसपासच्या लोकांना काय करावे समजत नाही. रुग्णाला रिक्षात घालून दवाखान्यात आणतात तोपर्यंत जीव वाचवण्यासाठी असलेल्या गोल्डन पिरीयड संपतो आणी मृत जाहीर करण्याचेच डॉक्टरांच्या हातात असते. १०८ ला फोन केल्यानंतर २० मिनिटांच्या आत अपघात स्थळी इमर्जन्सी अम्ब्यूलन्स येते. त्यात इमर्ज न्सीचे खास प्रशिक्षण घेतलेले तज्ञ डॉक्टर तसेच कठीण परिश्रम घेतलेली परिचारिका, वॉर्डबॉय असतात. असे सुसज्य ऑपरेटर थिएटर, आधुनिक मशिनरी, प्यथौलॉजी लयब आवश्यक औषधे, इंजेक्शन, ब्लड बँक, ऑक्सिजनची, आयसीयूची सर्व व्यवस्था व्यवस्था असते.  भूल देता येते. हॉस्पिटल जाईपर्यंत प्रयत्णांची पराकाष्ठा करून जीव वाचवला जातो. हे सर्व उपचार मोफत होतात. रुग्णांचे नाव माहिती नसतांना हे सुरु होते. भारताच्या अकरा राज्यात ही व्यवस्था होती. महाराष्ट्रात नुकतीच सुरु झाली आहे. १०८ आहे न मग काळजी नाही. इतका १०८ चा प्रचंड आधार असतो.

अपघातग्रस्थांसाठी पाहिले चाळीस मिनट मोलाची असतात. त्या वेळात उपचार सुरु झाल्याने आजवर हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. कोमा, अपंगत्व, मेंदूला धक्का पोहोचणे अपघातात काहीही घडू शकते. कित्येकदा केवळ रक्तस्त्रावाने मृत्यू येतो. आता कुठे अपघात दिसला की एकाच करायचे. १०८ नंबर प्रेस करायचा. अपघातात पोलीस फोर्स आवश्यक असतो. ते गर्दीवर नियंत्रण ठेवतात. रहदारी नियंत्रित करतात. १०८ चे एक मध्यवर्ती केंद्र १२ महिने २४ तास कार्यरत असते. तिथे डॉक्टर, पोलीस असतात आणी फायर ब्रिगेड विभाग असतात. संकटात, आगीत फायर ब्रिगेडचा उपयोग असतो. हे तिन्ही विभाग वेगळे असल्याने पूर्वी फार समस्या यायच्या. आता ते तिन्हीही इमर्जन्सी सेवेसाठी आलेले आहे. त्यांच्या कडे शहराचा डिजीटल म्यप असतो. अपघाताचे ठिकाण समजल्यावर म्यप वर ते लवकर येतात. सर्व संगणीकृत कार्य चालते. अचूक अनियमित, तत्पर काम होते. क्षणाचाही विलंभ नसतो.

१०८ चा उपयोग फक्त अपघातातांसाठीच नाही. आजकाल फ्लट संस्कृतीमुळे माणसाला एकमेकांचा आधार नसतो. जेष्ठ नागरिकांचा जोड्या परदेशात असल्यामुले एकट्या वृद्ध जोड्या असतात. जीवन साथीला काही झाले तर १०८ ला फोन करावा. हृदय विकार, उच्च रक्त दाबाचे अकटस, इतर गंभीर अचानक उधभवनाऱ्या विकारांसाठी ही सेवा उपयुक्त आहे. अशा अनेक विझत झालेल्या जीवांना, टिकटिक थांबत असलेल्या हृदयांना १०८ ने वाचवले आहे. त्वरित हार्ट मसाज, औषधोपचार सुरु होतात. १०८ ला विसरता कामा नये. प्रसूती कधी अचानक उद्भभवते तेव्हा बाळ – बाळतिणीचा जीव वाचू शकतो. कधी घरघुती अपघात होतात.लहान मुलांची प्रकृती अचानक गंभीर होते तेव्हा वाचवते १०८ हे वरदानच आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
104




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu