गुणकारी पुदिना…




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Mint is a natural stimulant, and the smell alone can be enough to charge your batteries and get your brain functioning on a high level again. Read some uses of mint for your health.

Useful Mintगुणकारी पुदिना हि फार फार महत्वाची पाले भाजी आहे. जमिनीवर यांचे छोटे छोटे झुडप दिसायलाही आकर्षक दिसतात ते त्यांच्या नक्षीदार पानामुळे, पुदिन्याचे तसे बरेच प्रकार आहेत. पण आपल्याकडे साधारणत: दिसततो तो पहाडी पुदिना होय. पुदिना हा पोटात गारवा देणारा व गॉस कमी करणारा, पाचक व वातानुमोलन करणारा आहे. या मुळे पोट साफ होऊन दुखणे कमी होते. हा खाल्ल्याने लघवी साफ होते व शरीरातील अनावश्यक व अहितकर द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. तसेच रोगजंतूचा नायनाट करतो, दमा व एलर्जी साठी गुणकारी आहे. सर्दी, सायनस, डोकेदुखी मायग्रेन यावरही उपयुक्त ठरतो. रोज या पानांनी दात घासल्यास दातांची चमक वाढून मजबुती वाढते व दात दुखणे कमी होते. त्यात मेंथोल असल्याने त्याच्या वासानेहि मन शांत होते. तसेच त्याचा उपयोग औषधे व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी व ऑरोमाथेरपित केला जातो. किडा चावल्यावर होणारी आग व खाज पुदिन्याचे पान चोळून त्यात किंचित कापूर वापरावा म्हणजे अजून गारवा वाटतो व आग आणि खाज कमी होते. साबण, तेल त्वचा वरील औषधे बनविण्यासाठी याचा वापर होतो. शरीरातिल वात विकार तसेच कर्क रोगावर याचा फार प्रभाव पडतो. आतड्यांच्या रोगांवर उपयुक्त आहे. रोज पुदिन्याची दोन तीन पाने खाल्ल्यास अपचनाचा त्रास होत नाही. उलटीच्या त्रासावर पुदिना खावा. मासिक पाळीत त्रास होत असल्यास पपई. कोरफड, व पुदिन्याचा रस फार परिणाम कारक ठरतो. पोटातील जन्तावर पुदिन्याचा रस त्यात सैंधव घालून घ्यावा. यात ‘क’ आणि ‘ब’ हि जीवनसत्व आहेत. तसेच फास्फरस, खनिजे व क्षार भरपूर प्रमाणात आहे. पुदिन्याची पाने मायक्रोवेव्ह मध्ये थोडी भाजून फ्रीज मध्ये ठेवल्यास बरीच टिकतात व त्यांचा स्वाद चांगला राहतो. याच्या गोळ्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu