Organic farming is a form of agriculture that relies on techniques such as crop rotation, green manure, compost, and biological pest control. Organic farming works in harmony with nature rather than against it. This involves using techniques to achieve good crop yields without harming the natural.
एका बाजूला अशी परिस्थिती असूनही एक समाज निरोगी आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र चक्क नकारार्थी आहे. विविध प्रकारचा अलर्जी (allergy) संधिवात, (diabetics) यांसारख्या दीर्घकालीन आजार तसेच cancer व हृदयरोग यांसारखे जीवघेणे आजार झपाट्याने सर्वच समाजाला ग्रासत आहेत. वरवर पाहता कोणतेही स्पष्ट कारण नसता, निर्व्यसनी, सदाचारी व्यक्तीलाही आज कॅन्सर होत आहेत या सर्वांचाच सर्वांगीण आणि मुळापर्यंत जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण प्रश्न शेवटी आपल्या सर्वांच्या जीवनाचा अस्तित्वाचा आहे.
या सर्वांचे मुळ आपल्या बदललेल्या शेतीच्या तंत्रज्ञानात आहे. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसेल. हजारो वर्ष माणूस परंपरागत रीतीने शेती करत आला आहे आणि “उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नोकरी” ही म्हण फार प्राचीन काळापासून प्रचलितही आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा इतका वापर होऊनही आताच्या शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट का झाली? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या आजारांचे मुळ काय? हे शोधायचा प्रयत्न केला तर वेगळेच चित्र डोळ्यासमोर येते.
आपण किंवा सर्व सजीव सृष्टी हे सर्व निसर्गाचे अविभाज्य अंग आहोत पन्नास वर्षापुर्वीपर्यंत आपले सर्व व्यवहार इतर प्राण्याप्रमाणे निसर्गाला धरूनच होते. पक्षी जसे सूर्योदयापूर्वी जागे होवून आपले सर्व कामे करून सुर्यास्ताला घरट्यात परततात. तसेच सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत असे आपले जीवनचक्र होते. परंतु विजेच्या शोधाने व वापराणे आपले जीवनचक्र पार बिघडून गेले. रात्रीचा दिवस झाला, रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे येथपासून, fast food, junk (जंक) फूड वापरापर्यंत मजल गेली. अजूनही समाजाला या बदलांची जाणीव झालेली नाही आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी निसर्गाला अनुसरून जीवनशैली असायला हवी असे कळलेले नाही. जीवनशैलीमध्ये सुधारणा केले तरी चांगले आरोग्यसंपन्न जीवनजगता येईल.
आजच्या लेखाचा विषय याच्याही पलीकडचा आहे. पारंपारिक शेतीमध्ये आलेल्या धान्यातून शेतकरी पुढील वर्षासाठीचे बियाणे राखून ठेवायचा,ते टि टिकवण्याच्या ते टिकवणाच्या पारंपरिक पद्धती होत्या. वर्षानुवर्ष लोक साधाच परंतु, विशिष्ट प्रकारचा आहार घेत होते. तंत्रज्ञानाचा वापर जसा सुरु झाला तसा बियाणांच्या कंपन्यांनी तात्कालीकदृष्टया फायद्याची होतील अशी संकरीत वाणे बाजारात आणली. तात्पुरत्या फायद्याला शेतकरीही भुलले आणि पारंपरिक बियाणे सोडून संकरीत बियाणांच्या मागे लागले. दरवर्षी शेतकऱ्यांनी आपल्याकडूनच बियाणे खरेदी करावे म्हणून बियाणांची प्रजनन क्षमताच नाहीसी केली गेली. वास्तविक वंशपरंपरा टिकवणे हा कोणत्याही सजीवाच्या ठिकाणी उपजत गुणच असला पाहिजे. आणि निसर्गनियमानुसार तसा होता ही परंतु संकरित बियाणांमुळे त्याला फाटाच मिळाला. ज्या अन्नधान्यात वंशपरंपरा टिकवण्याचे सामर्थ्य नाही ते खाल्यानंतर सर्व प्राणीस सृष्टीवरती काय परिणाम होईल ते सांगण्यासाठी कोण्या तत्ववेत्याची गरज नाही. निदान मानव जातीचा विचार करायचा झाला तरी आपल्या प्रजननक्षमतेवर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही हे निर्विवाद !
संकरीत बियाणांना स्वतःची प्रतिकारशक्ती नसल्यामुळे रोपे रोगाला बळी पडू नयेत म्हणून किटकनाशकांचा मारा सुरु झाला आणि आम्ही आमच्यात हाताने आमच्याच अन्नात विष कालवायला सुरुवात केली. वास्तविक “रेचेल कार्सन”या अमेरिकन संशोधीकेने तिच्या ‘silent spring’ या पुस्तकातून धोकाच्या इशारा दिला आहे.DDT च्या वापराणे पर्यावरणाची कशी हानी होत आहे हे त्यांनी सप्रमाणात सिद्ध केले होते. या पुस्तकाच्या आधाराने च पुढे पर्यावरणवादाची चळवळ उभी राहिली आहे. परंतु त्याकाळी दखल कोणीच घेतली नाही आणि कीटकनाशकांचा वापर फोफावतच राहिला. जो भारतासारख्या देशात आजही अंदाधुंध पद्धतीने चालू आहे.
याला जोड मिळाली ती रासायनिक खतांची आणि वस्तू टिकवणाच्या रासायनिक पदार्थाची (preservatives) वास्तविक शरीर आहारापासून बनतात हा आयुर्वेदाचा मुलभूत सिद्धांत दुर्दैवाने अमेरिकन वैधकाने सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन पूर्णपणे मागे पाडून लाक्षणिक चिकित्सेचे तंत्र उदयाला आहे. तात्पुरते बरे वाटण्याच्या आभासालाच चिकित्सा समजले गेल्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासांसाठी त्याची कारणे हुड्कायची असतात. या कार्यकारण भावणावर आधारित शास्त्र सकल्पनेलाच तडा केला. काहीही, कधीही, कसेही खा, फक्त ही केमिकलयुक्त औषधे घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल असा पायंडा पडला. त्यामुळे स्त्रियांच्या रोगांविषयी किंबहुना सर्दी, खोकल्यासाठी अथवा त्वचा विकारासाठी आम्ही जेव्हा खाण्या-पिण्याविषयी चौकशी करतो. तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. अशा प्रकारचे प्रश्न त्यांना कोणी विचारलेले नसतात. यामुळे सगळ्या समाजाची मानसिकता आहाराविहाराकडे काही लक्ष द्यायला पाहिजे याचा विचारच न करण्याची आहे.
या सर्व पाश्वभूमीवर शेतीमधले आमुलाग्र बदल आमच्या जीवावर उठले आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलांची जागा ट्रक्टरने घेतली, विहिरीतून पाणी काढणारे रहाड गाडगे आणि मोट यांच्या जागी विजेचे पंप, बैलगाड्या जाऊन मोटारसायकलचा जमाना सुरु झाला. त्यामुळे शेतीसाठी बैलाची गरजच नाही. दुधाला भाव जसा आला आणि पिशवीतील प्यकबंध दुध शहरात विकता येऊ लागले तसे वासरांनी शेतकऱ्यांनी वासरांचे पण दुध तोडून विकू लागले. वासरे अशक्त होवून गाईच्या पुढच्या ,पिध्याच अशक्त होऊ लागल्या त्यामुळे दुधाचे प्रमाण खूप कमी झाले. त्यावर उतारा म्हणून कृत्रिम फलरेतन करून गायी संकरित करण्याचा सपाटा चालू झाला. विशेषतः अ १ जातीच्या गाईचे दुध आरोग्याला अत्यंत घातक आहे असे न्यूझीलंडच्या डॉक्टरांनी ‘डेव्हिल इन युअर मिल्क या पुस्तकाद्वारे जग जाहीर केल्यावर विशेषतः पाश्च्यात्य देशात मोठी खळबळ माजली. ब्राजीलाने भारतातील ‘गीर’ जातीच्या गाई नेऊन त्या वंशाची शुद्धता टिकवली व गाई अजूनही २० ते २२ लिटर दुध अजून देतात. भारतात मात्र आत्ता यासाठी काही प्रमाणात जागृती सुरु झाली आहे. देशी गाईचे दुध मिळणे हा दैव दुर्लभ सुयोग आहे. गोमुत्र, गोमय यासारख्या गोउत्पादनात सेंद्रियशेती उत्तमरीतीने होत होती. पशुधनच नाहीसे झाल्याने निसर्गाचा समतोलच ढासळला. रासायनिक पदार्थाचा वापरामुळे जमीन, पाणी, हवा, अन्न सर्व गोष्टी प्रदूषित झाल्या. यापुढेही असेच चालू राहिलास रासायनिक पद्धतीच्या शेतीतूनही काही उत्पन्न मिळणार नाही. उलट रोगांचे प्रमाण मात्र सातत्याने वाढत राहील.
या सर्वांचा मथितार्थ इतकाच की, आपण निसर्गाचेच एक अंग आहोत याची जाणीव सतत ठेवून नैसर्गिक पद्धतीचीच सेंद्रिय शेती करणे हिताचे आहे आणि इतरत्रही नैसर्गिक साधनांचाच वापर करणे हिताचे आहे. शेवटी प्रश्न आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा आहे.
कडूनिंब
- सदाहरित आणी सर्वत्र वाढणारी वनस्पती असून सर्वांच्या परिचयाची आहे.
- पाने, फुल, बी, साल, मुल, इ. सर्व भागांचा औषधात उपयोग करता येतो.
- विविध तापांवर याचा प्रामुख्याने उपयोग होतो. सालीचा काढा ताप जाण्यासाठी व भूक व्यवस्थित लागण्यासाठी होतो.
- कुठल्याही जखमावर यांच्या पानांचा वाटून लेप केल्याने त्या लवकर बऱ्या होतात. आणी जंतुसंसर्ग होत नाही.
- निंबोण्यापासून तेल निघते. याचा वापर बऱ्याचशा त्वचा विकारांवर दिसून येते.
- कडूनिंबाच्या पानांचा रस २-३ चमचे नुकतीच प्रसूत झालेल्या स्त्रीला देतात. याने गर्भाशय चांगले शुद्ध होण्यास मदत होते.
- कडूनिंब वातावरण चांगले आणी शुद्ध ठेवण्यास उपयुक्त आहे. साथीच्या आजारांना काही प्रमाणात आळा बसतो.