एक नगरसेवक ते मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस




Like
Like Love Haha Wow Sad Angry

devendra

28 ऑक्टोबर : आजपर्यंत देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा आणि विदर्भवादी म्हणून ओळखले जात होते. परंतु आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणार आहेत. एक नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री असा यशाचा टप्पा गाठणारे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संशिप्त परिचय…

‘देवेंद्र फडणवीस ये नागपूरने देशको दी हुई एक सौगात है’, या कौतुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांनाच मोदींची पहिली पसंती मिळेल याचा अंदाज आला होता. देवेंद्र फडणवीस1999 मध्ये  पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांना स्वतःचं बळकट स्थान निर्माण करण्यास फारसा वेळ लागला नाही. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 मध्ये झाला. देवेंद्र यांच्यावर लहानपणापासूनच राजकारणाचे संस्कार झालेले आहेत. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. तर त्यांच्या काकू शोभा फडणवीस या युती सरकारमध्ये मंत्री होत्या. देवेंद्रनी नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस 1987 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव झाले. वयाच्या 21व्या वर्षी ते नागपूर मधील रामनगर वॉर्डातून नगरसेवक झाले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले. देशात सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. 2 वर्षांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. २०१० मध्ये त्यांची भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक झाली आणि गेल्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली.

अभ्यासूपणाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही देवेंद्र यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना संघाचेही आशीर्वाद मिळू मिळालेले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत होती. खुद्द देवेंद्र फडणवीस स्वतंत्र विदर्भाच्या बाजूचे आहेत. पण आता त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आलीय. त्यामुळे राज्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अल्प परिचय

– 22 जुलै 1970 रोजी जन्म
– देवेंद्र यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू
– वडील गंगाधर फडणवीस विधान परिषदेचे आमदार
– काकू शोभा फडणवीस युती सरकारमध्ये मंत्री
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी
– 1987मध्ये अभाविपचे सहसचिव
– 1992मध्ये रामनगर वॉर्डातून नगरसेवक
– वयाच्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर
– देशात सर्वात लहान वयाचा महापौर होण्याचा मान
– 1999मध्ये नागपूर पश्चिममधून आमदार
– 2010मध्ये भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक
– 2013मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu