थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजम
जन्म -इ.स.१८८७
मृत्यू -इ.स. १९२०
कधी कधी निसर्ग एखादी अलोवकिक रचना करतो. त्यासारखी कलाकृती मानवजीवित पुन्हा आढळत नाही. वास्तविक कुंभकोणम येथे काम करणारे- कापड दुकानात नौकरी, तीही मुकादमाची- काटकसरीने जीनवचरितार्थ चालवणारी त्यांची पत्नी या दांपत्याला ईश्वराने एक अपत्य दिले आणि तामीलनाडू मधील तिरोड या गावी श्रीनिवास राजानुजम यांचा जन्म झाला.
जन्मतः च गणिताची आवड, कुंभकोणमला प्राथमिक शिक्षण व टाऊन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली ही याच काळात. पाच मुलात पाच फळे वाटली तर प्रत्येकाच्या वाटयाला एक फळ येईल. दहा मुलात दहा फळे वाटली तरी एक फळ येईल. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले तर भागाकार एक येईल. शिक्षकांनी समजावून दिले,राजानुजम उठला व म्हणाला आपल्याकडे शुन्य फळे आहेत. ती शुन्य मुलाला वाटली तर शुन्य भागिले शुन्य असे होईल का? की भागाकार असे येईल? शिक्षक चक्राऊन गेले. पण पुढे रामानुजनी अवघड गणिते सोडवून जगाला चक्रावून सोडले. बीजगणित,भूमिती,गणितशास्त्र, गणशास्त्र, १८६० साली जी.एस.कार. यांच्या ‘सिनॉप्सीस ऑफ पिउअर मैथमेटिक्स’ या केम्ब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या सहाशे सिद्धांतसूत्रांची सर्व सुत्रांवरील उदाहरणे सोडून दाखविली. प्रज्ञावंत जगाला जे साधले नाही,ते राजनुजनी करून दाखवले. पण अन्य विषयांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. श्री. रामचंद्रन या जिल्याधीकाराने त्यांना प्रोत्साहन दिले. लेखनप्रवृत्त केले. त्यांचे शोधनिबंध फ्रान्सिस स्प्रिंग- पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अधिकारी यांना आवडले. कोणतीही पदवी नसतांना त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे ते संशोधक झाले. केब्रिज विद्यापीठातील प्रा. हार्डी आणी जे. इ. लिटलवूड या दोघांनाही जे सुचले नव्हते. ते रामानुजने नकळत लिहिले होते. त्यांनी रामानुजला केब्रिजला बोलाविले.कर्मनिष्ठ आई व प्रवासखर्च या दोन अडचणी व दैवाने निराकरण केल्या. डॉ. राधाकृष्णननी आशीर्वाद दिला. खाण्यापिण्याची आभाळ आई, मित्र,पत्नी यांचा वियोग, मितभाषी स्वभाव यांमुळे पोटात भूख,हृदयात प्रेम, बुद्धीत गणित व जीवनात निराशा यामुळे रामानुजम भारतात आले. विकलांग अवस्थेत मद्रासच्या आरोग्याधामात आले. आसन्नमरण अवस्थेत गणिताची शिखरे चडत २६ एप्रिल १९२० रोजी कैलासवासी झाले. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे तेहेतीस वर्षे.