प्रयोगशालांचा निर्माता डॉ. शांतीस्वरूप भटनागर
जन्म- इ. स. १८९५
मृत्यू-इ. स. १९५५एका सामान्य घरात १८९५ साली श्री. शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या आठ महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि तो मुलगा आईसह मामाच्या घरी वाढला. मामांनी व आजोबांनी त्याचे पालनपोषण केले. त्याची बुद्धिमता आणि शास्त्रीय विषयांची आवड पाहून त्यांनी त्याला शिक्षणासाठी लाहोरला आणले.
जाच्यात बुद्धिमान व परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा एम. एस्सी. झाला व शिष्यवृत्ती मिळवून तो इंग्लंडला गेला. इंग्लंडहून परतल्यानंतर पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्यांना बनारस हिंदू विध्यापिठात प्राध्यापक नेमले. शिकवण्याचे काम आटोपताच फावल्या वेळात त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करण्याची सुरुवात केली. डॉ. प्रफुल्लचंद्र रे, डॉ. सी. व्ही. रामन, यांनीही त्यांच्या लेबॉरेटरीला भेट दिली.भारतात त्यांनी अनेक ठिकाणी वैज्ञानीक प्रयोगशाळा सुरु केल्या म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय ठरले. नंतर त्यांना पंजाब युनिव्हर्सिटीने रसायनशास्त्राचे प्रमुख संचालन केले. त्याच काळात औध्योगिक संशोधकविषयक संस्था कलकत्ता येथे स्थापन झाली आणि डॉ. भटनागर यांना प्राचार्य म्हणून बोलवण्यात आले.१९४१ साली त्यांना इंग्रज प्रशासनाने त्यांना शास्त्रसंशोधनात अध्ययन कार्याबद्दल त्यांना ‘सर’ ही पदवी देण्यात आली. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताची औध्योगिक प्रगती झपाट्याने व्हावी,असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी ‘सायंटिफिक कौन्सिल ऑफ शास्त्र व उद्योग’ याची स्थापना केली व त्या कौन्सिलच्या चेअरमनपदी डॉ. भटनागर यांची नेमणूक केली. मरेपर्यंत ते त्या संस्थेचे चेअरमन होते.
एका सामान्य घराण्यात जन्मलेल्या मुलाने स्वकर्तुत्वाने देशाच्या विकासकार्यासाठी आपले सारे जीवन व्यतीत केले.
देशसेवेचे हे एक महत्वपूर्ण उदाहरण आहे. विधायक वृत्तीने लोकसेवा करून देशाची शान वाढवता येते, यांचे डॉ. शांतीस्वरूप भटनागर हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीचा उदाहरण म्हणजे शांतीस्वरूप भटनागर यांचा जीवनप्रवाह असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९५५ साली त्यांचे निधन झाले.