मानवी संगणक शकुंतलादेवी
जन्म – इ. स. १९३९
मृत्यू – इ. स. १९९८
साधे गणित सोडवायचे तर आपल्याला कंटाळा येतो, तर मग गणितातील समस्या – अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे अशा जगडव्याळ झंझटात कोण पडणार? पण ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या व निसर्गानेच निर्माण केलेल्या मेंदूचा चमत्कार म्हणावा अशा बुद्धीचा वरदहस्त लाभलेली ही स्त्री भारतात जन्मली. तिचे नाव शकुंतलादेवी. अत्यंत कठीण वाटण्याऱ्या अंकगणितातील समस्या त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील सर्व शास्त्र ज्ञांना आचंबित केले.
सर्व साधारणपणे दुविधेत टाकणारी सूत्रमय समीकरणे संगणक – कॉम्प्युटर्सच्या मदतीने सोडवितात, पण शकुंतलादेवींना अशी उत्कृष्ट मज्जास्वंस्था लाभलेली की त्या संख्याशास्त्राखेरीज फलज्योतिष्यशास्त्रातही आपली बुद्धिमत्ता वापरत असत.
लहानपणापासूनच त्यांना या दिव्यशक्तीचा प्राप्ती झाली. अंकगणितातील कोणतीही समीकरणे त्या काही सेकंदात सोडवीत, वयाच्या ३ ते ५ वर्षाच्या काळातच ते गणितज्ञ झाल्या त्यांचे साधारण शिक्षणही झाले नाही. त्यांच्या वडलांनी त्यांना अनेक ठिकाणी नेऊन त्यांच्या असामान्य बुद्धीचा चमत्कार दाखवला. त्यांच्या या असामान्य ख्यातीने देशाच्या मर्यादा ओलांडल्या. परदेश्यात त्यांची ख्याती पसरली. एका सर्वांग परीपूर्ण गणिततज्ञ असाच त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो.
बी. बी. सी. – लंडन या संस्थेने त्यांना आग्रह्पूर्णक निमंत्रण दिले. त्यांचा कार्यक्रम टेलीव्हिजनवर प्रदर्शित केला. फक्त संग संगणकावरच सोडविता येईल अशा प्रश्न विचारला आणी त्यांनी त्याचे निमिषाध्रातच तोंडी उत्तर दिले. १८ जून १९८० साली रोजी त्याला २६ अंकी संख्या देऊन फक्त २८ सेकंदात उत्तर देण्यात सांगितले. अंक होता १८९४७६६८१७७९९ आणी ५४२६४६२७७३७३० यांचा गुणाकार. इम्पिरियल कॉलेज,लंडनचा हा प्रश्न. १९७६ साली त्यांनी अमेरेकील शास्त्रज्ञांनाही असे विस्मयचकित केले.
अशा संख्याशास्त्रज्ञ शकुंतलादेवींनी सारे पाश्यात्य जग भारावून टाकले.
स्वामी विवेकानंदानी आपल्या भाषणांनी शकुंतलादेवीनी आपल्या संख्याविज्ञानाने सर्व विश्वाला दाखवून दिले की भारतातही बुधीमत्तेचा वाणवा नाही.
1 Comment. Leave new
He is a my lifetime