संत सावतामाळी
‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’। ‘मोटविहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी। ‘ लसुन, मिरची कोथिबिरी, अवघा झाला माझा श्रीहरी’। ‘ आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामाच्या अनुभवातून देवाची भक्ती करू पाहत संत सावतामाळी जाती जातीतून भगवत भक्तीचा गेंध फुलवत होता. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात सावताबाबा आपल्या रोजचा उद्योगालाच हरिभक्ती समजून त्यात पूर्णपणे रंगून गेले होते. पूर्णवेळ बाद्काम करणारे सावताबाबा आपल्या नित्य उद्योगात रत होऊन जात आणि चित्तात भगवंताचे स्मरण ठेवत. देव सदा सर्वकाळ तुमच्या सान्निध्यातच वसतो, हे तत्व त्यांनी आपल्या आयुष्य भराच्या व्यवहाराने सामान्य जनाचा व्यवहाराने सामान्य जनांच्या मनावर ठसवते.
” वैकुंठाचा देव आणू या कीर्तनी ।
विट्ट्ल माउली नाची रंगी ।।”
असे आत्मविश्वासपूर्वक ते म्हणत. महाराष्ट्रातील समाजाला सावता माळी या भगवतभक्ताच्यारूपाने लाभलेला हा दीपस्तंभ. आज सातशे वर्ष झाली तरी परमार्थाची वाट नित्यनुतन तेजाने उजळत राहिलेली आहे.