संत गोरा कुंभार
संत गोरोबा कुंभार आजच्या उस्मानाबाद जिल्यातील रहिवाशी. ज्ञानेश्वरकालीन सर्व संत मंडळीत ते वयाने तर जेष्ठ होतेच, परंतु आध्यात्म मार्गातील त्यांचा अधिकारही सर्वांनी मान्य केला होता. नामदेवाच्या डोक्यावर आपले थापाटने मारून हा अजून कच्चा घडा आहे, असे त्यांनी सांगितल्याची आख्यायिका प्रसिध्द आहे. द्यानदेवांची सर्व भावंडे आणि इतर मंडळी त्यांना गोरोबा काका आदराने म्हणत.
प्रपंचात राहूनही त्यांनी पराकोटीचे वैराग्य अंगी बाणऊन घेतले. ”न लिपींचे कर्मी, न लिपींचे धर्मी । नालिंपे षड्मुर्मी पुण्यापापा । म्हणे गोरा कुंभार सहजी जीवनमुक्त । सुखरूप अद्द्वैत्त नामदेवा ।।” असे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे. एकदा मडकी बनवण्यासाठी माती भिजवून ती पायाने तुडवीत चिखल मळण्याचे त्यांचे नित्यकर्म चालले होते. तोंडाचा हरिनामाचा जप करीत ते आपल्याच तंद्रीत चिखल तुडवत असताना त्यांचे स्वतः चे मुल रांगत रांगत त्यांच्या पायाशी आले आणि चीखलाबरोबर तुडवीत गेले तरी गोरोबांना त्याचे भान नव्हते. परमेश्वराने त्यांच्या भक्तिभावाने प्रसंन्न होऊन त्यांचे बाळ त्यांना सजीव करून परत दिले. असा चमत्कार त्यांचा बाबतीत सांगितला जातो गोरोंबाच्या कार्यामुळे भागवत धर्माचा पाया व हिंदू त्वातील ऐक्यभाव आजपर्यंत द्रुढ राहिला यात शंका नाही.