मर्क्युरस नाइट्राइटचा जनक प्रफुल्लचंद्र रे (Prafulla Chandra Ray)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1603111
praful ray
praful ray

 

मर्क्युरस नाइट्राइटचा जनक प्रफुल्लचंद्र रे
जन्म-२ ऑगस्ट १८६१
मृत्यू-इ. स.१९४४

या विज्ञानयतीचा जन्म बंगालमधील खुलना जिल्ह्यातील रारुली कतिपरा या खेडेगावात २ ऑगस्ट १८६१ या दिवशी झाला.
हरीश्चंद्र रे या त्यांच्या शिक्षणप्रेमी वडलांनी आपल्या वाड्यात स्वखर्चाने चालवलेल्या विद्यालयात प्रफुलचंद्र रे यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर म माध्यमिक शिक्षणासाठी ते कलकत्त्यास गेले. डेविड हेयर या शिक्षणशास्त्रज्ञाच्या मनात हा बुद्धीमान मुलगा भरला.  अथक परिश्रम,प्रामाणिकपणा,नियमितपणा या समवेतच अफाट वाचन त्याच्या जोडीला शास्त्रीय ज्ञाण्याची आवड त्यांना होती. आजारपणामुळे त्यांची दोन वर्ष खेड्यातच गेली.
१८७९ साली ते विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया पास झाले. महाविद्यालयात इंग्रजी समवेत रसायनशास्त्र हा विषय त्यांनी घेतला. त्यांनी १८८२ साली ग्रिलफ्रि स्ट ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे ते इंग्लंडला गेले.एडिंग्बरो येथे त्यांनी प्रथम रसायनशास्त्राची बी. एस्सी. व नंतर त्यात विषयात १८८७ साली डी. एस. सी. पदवी संपादन केली. जगदीशचंद्र बोस (बसू) हेही त्याच कॉलेजात शिकत होते. इंग्लंडमधील दऱ्या,शिखरे,नद्या,अरण्ये,बर्फ,धुके,यांचा आवडता छंदही त्यांनी तेथे पूर्ण केला.
‘स्वातंत्र्यसमरापूर्वीचा आणि नंतरचा भारत’ या विषयावर त्यांनी निबंध लिलिहा. इंग्रजांच्या धोरणाविषयी त्यांनी परखड विचार मांडले त्यामुळे त्यांचे कौतुक झाले मात्र पारितोषिक मिळाले नाही. पण प्रफ्फुल्लचंद्रांचा दर्जा पाहून त्यांना होप प्राइज शिष्यवृत्ती व ज्ञानसंपादनासाठी मुदतवाढ मिळाली.
१८९६ मध्ये त्यांनी मर्क्युरस नाईट्राइट या  कंपाउंडचा शोध लागला. इंडियन स्कूल ऑफ  केमिस्ट्री व इंडियन केमिकल सोसायटी या दोन संस्था त्यांनी काढल्या. ‘हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री’ हा ग्रंथ दोन भागांत लिहिला. रसायनातील अनर्व,अर्व व वास्तव या तीन शास्त्रांपैकी अनर्व रसायनात त्यांनी संशोधन केले. मर्क्युरस नाईट्राइटच्या शोधामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. बर्थलॉट, व्हिक्टर मेयर, व्होलॉर्ड रास्को या शास्त्रज्ञानी त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.
आपल्या साठलेल्या पगारातून दहा हजार रुपयांची देणगी त्यांनी कलकत्ता विद्यापीठाला दिली.
वयाच्या ८३ व्या वर्षी सन १९४४ साली त्यांचे  निधन झाले. राष्ट्रीय विचारांच्या या  थोर देशभक्ताला प्रणाम करताना महात्मा गांधी म्हणाले.आचार्य देवो भव Ị

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1603111




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu