अहिल्याबाई होल्कर
जन्म – ३१ मे १७२५
मृत्यू – १३ ऑगस्ट १७९५
नाव – न्या. अहिल्याबाई खंडेराव होल्कर
कीर्तिवंत महाराष्ट्राचा इतिहासात ज्या शोर्यवान स्त्रिया होऊन गेल्या. त्यामध्ये अहिल्याबाई होल्कर या कायमच चमकून दिसतात. माणकोजी शिंदे या धनगर जातीच्या कुटुंबात जन्मास आलेल्या अहिल्याबाई या लहानपणापासूनच धैर्यवान व धाडसी वृत्तीचा होत्या. खंडेरावांशी अवघ्या आठव्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्यांचा व्यवहारचतुर व स्वाभिमानी विचार प्रणालीने सासर मंडळीत अहिल्याबाई प्रभावी ठरल्या. स्वतः खंडेराववंवरही त्यांचा मोठा प्रभाव होता. सुभेदार मल्हारराव होल्कर हेही त्यांचा करारी व्यक्तिमत्वाला दाद देऊ लागले. गुणसंपन्न अहिल्याबाई पुढे फौजवर जाऊ लागल्या. रणांगणातील डावपेच त्यांनी धुरंधर वृत्तीने शिकले व त्यामुळे मल्हारराव निश्चित झाले.
पुढे मल्हाररावांच्या फौजेची घोडदौड चालू असतानाच अहिल्याबाईवर दुखः चा डोंगर पडला. खंडेरावाचा अंत झाला व मल्हाररावही खचले. अशा वेळेस सासरच्या विनवणीने अहिल्याबाई राज्याची सूत्रे हातात घ्यायला तयार झाल्या. मल्हाररावांचेही निधन झाले. पुढे पुत्र मालेराव यांचाही अंत झाला व गादीला पुढे वारस कोण हा प्रश्न उभा राहिला. घरभेदयांनी व पदरी असलेल्या सरदारांनी त्यांना जंगजंग पछाडले. परंतु धाडसी अहिल्याबाई नमल्या नाहीत. त्यांच्या शौर्याच्या गाथा मराठी मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.
1 Comment. Leave new
Ahilyabai hollar yanchi mulgi muktabai hiche lagan konasobt zale?