जय जवान जय किसान
जन्म – २ ऑक्टोंबर १९०४ (वाराणसी)
मृत्यू -१ जानेवारी १९६६
नाव -लालबहादूर शास्त्रीभारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री. काशी विध्यापीठातून त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली. देशसेवेच्या तीव्र ओढीने लाला लजपतराय यांच्या लोकसेवेत समाजाचे जे सदस्य झाले. तेथे त्यांनी मनापासून कार्य केले. स्वातंत्रचळवळीतून त्यांना अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यातूनच त्यांची पं. नेहरूंशी ओळख झाली. तुरुंगवासात त्यांनी वाचन, मनन, लेखन करण्यात वेळ घालवला.
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर १९५२ सालच्या निवडणुकीत लालबहादूर लोकसभेत निवडून आले, व पंडित नेहरूंचा मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले. शास्त्रीजींचा कारभार रोख असे. एका रेल्वे अपघातामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. पुढील निवडणुकीत व्यापार आणि उद्योग मंत्री झाले. १९६१ साली गृहमंत्री झाले. व नेहरूंच्या निधनांनंतर ९ जून १९६४ पासून भारताचे पंत्रप्रधान झाले. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यामुळे त्यांनी जवानांना हिरवा कंदील दाखवला. पाकिस्तानला भारतीय फौजांनी त्यांना जागा दाखवून दिली जवानांनी यशस्वी कामगिरी केली! स्वातंत्र्याचे रक्षण आणि लोकांचे पोषण यांचे अजोड रहस्य पटविण्यासाठी ‘जय जवान जय किसान’ हा मंत्र शास्त्रीजींनी राष्ट्राला दिला. त्यांच्या कार्याच्या अजोड प्रतिमेमुळेच राष्ट्रपतींनी त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब बहाल केला.