राजमाता जिजाबाई
जन्म-१२ जानेवारी १५९८
मृत्यू- जून – १६६४
स्वतः च्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रीया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली अशी भाग्यवती एक राजमाता जिजाबाईच श्री. छत्रपतींची माता.
जिजाबाई ही सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या. शिंदखेडचे जाधवराव निजामशहाच्या पदरी मोठे मातब्बर सरदार होते. तर वेरूलचे मालोजी भोसले यांचा शहाजी राजांचा मुलगा हा अतिशय तल्लख दिसणारा मुलगा. जीजाईच्या मनात लहानपणीचा शहाजी भरून राहिलेला. पण मालोजी व लखुजी जाधवांचे वैर. परंतु खुद्ध निजामशहानंच जाधवरावाला ही सोयरिक करण्यास सांगितलं व लग्न थाठात झाले.
जिजाबाई फारच समजूतदार. लग्नानंतर मुलगी माहेरची नसतेच, तिच खरं घर तिचं सासरंच असायला हवं, हे जाणून तिने जन्माला माहेरचा विरोध पत्करला.
जिजाबाई पोटी १६२७ साली शिवाजीचा जन्म शिवनेरीवर झाला. शिवरायांनी जिजाबाई व शिवबा यांना पुण्याच्या जहागिरीमध्ये पाठवले व दादाजी कोंडदेव आपले विश्वासू व सज्जन कारभारी त्यांच्या बरोबर दिला.
शिवाजी या लहानच, पण या क्षणापासून दोन उत्तम गुरु त्याला लाभले. एक दादाजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु प्रत्यक्ष माता जिजाबाई!
माता जिजाबाईचं कर्तृव्य फार थोड म्हटलं पाहिजे शिवाजीच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे जिजाऊंनी कठीण काम केलं महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलाला रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते.
यवनांचा उच्छेद करून आपण्याच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजीने चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले घेतले आणि १९७४ साली शिवाजी छत्रपती झाले ! जिजाबाईंच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वत्रंत्र राज्य व्हावं’ ही तिच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. आता जिजाबाईला थकवा आला वय ८० वर्षाच होत आलेलं राज्यारोहणाचा सोहळा डोळ्य़ाभर पाहिल्यानंतर पंधराच दिवसांनी १६७४ च्या जून महिन्यात राजमाता जिजाबाई स्वर्गवासी झाली. मत कशी असावी याचा एक उच्च आदर्शच त्यांनी आपल्या जीवनात निर्माण केला यात संदेह नाही.
आपण ही माहिती वाचकांपर्यंत पोहचवता चांगला उपक्रम आहे पण , राजमाता जिजाऊ साहेबांचा मृत्यू १६६४ नाही तर १६७४ ला झाला आहे , आपण चुकीची माहिती प्रसारित करत आहात ।
Very interesting story