खगोल शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर
जन्म- ३१ जुलै १९३७पाश्च्यात्य संशोधकांनी जे शोध लावले त्यामागे,व्यापार,यंत्र,तंत्रज्ञान हाच पाया होता. त्यांत युध्संभार, वसाहतवाद वाढविणे व भांडवलशाही समाज रचनेचा विकास प्रामुख्याने आढळतो. परंतु त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सत्य, अहिंसा आदी जीवनमूल्यांचा ‘सर्वपि सुखिन : सन्तु सर्व सन्तु निरामय :’ अशा ‘मंगलं भवतु सब्ब मंगलम’ या विश्व कल्याणकारी भावनेचा अभावानेच साक्षात्कार होतो.
जयंत विष्णू नारळीकर हे आजचे विश्वमान्य संशोधक याच ध्येयवादानेच प्रेरित झालेले विख्यान शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे रंग्लर होते. त्यांचे आई – श्री कृष्णाजीपंत हुजूरबाजार यांची कन्या – संस्कृत विदेशी आहे. अशा सुविध्य दांपत्याच्या पोटी दि. ३१ जुलै १९३७ साली श्री. जयंतरावांचा जन्म झाला. जात्याच हुशार आणि सुसंस्कृत, बुद्धिमान असणारे जयंत नारळीकर बनारस युनिव्हर्सिटीतून १९५८ साली एस. सी. झाले व त्यानंतर १९६० साली केंम्ब्रिज विध्यापिठातून बी. एस. एम. ए. पीएच. डी. असे उच्च शिक्षण घेतले.
खगोलशास्त्रातील मानाचे ‘टायसन पारितोषिक’ त्यांनी मिळविले. १९५९ साली गणितशास्त्रातील रंग्लर झाले. १९६२ साली ‘स्मिथ्स पारितोषिकाचे’ मानकरी ठरले.
विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी हॉइल, बॉडी व बार्नीज व शास्त्रज्ञासमावेत स्थिरस्थिती विश्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिद्धांत सिद्ध केला. विश्व स्थिर असले तरी ते आकुंचन – प्रसरण पावते, पण एकंदरीने ते विकसनशील आहे, प्रसरण पावत आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला.
नारळीकर यांच्या मते, विद्यानाचा मनाशी, बुद्धीशी संबंध आहे. विध्यानातील अनेक सिद्धांत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक कथा -कादंबऱ्या लिहिल्या व विज्ञान लोकप्रिय केले. भारतातील अनेक शास्त्रज्ञापैकी त्यांनी ‘इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रानॉमी अस्ट्रोफिजिक्स’ या संस्थेची उभारणी केली. अनेक पुरस्कार मिळवूनही नम्र सौजन्यशील उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेला हा भारतीय संशोधक अजूनही कार्यरत आहे.