चंद्रशेखर आझाद
नाव – चंद्रशेखर सीताराम तिवारीचंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यभारतातील झाबूआ तहसिलातील झावरा गावी झाला. त्यांच्या वडलांचे नाव पंडित सीताराम तिवारी, व मातेचे जनदानीदेवी असे होते. बनारसला संस्कृतचे अभ्यास करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या छोट्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला बारा फटकयांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांच्या शिक्षेमुळे आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व अहिंसेवरील त्यांचा विश्वास साफ उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्री प्रणवेश कनींनी त्यांना क्रांतीची शिक्षा दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजना त्यांत चंद्रशेखर आझाद हे आगाडीवर होते.
पोलिस अधिकारी सॉडर्सचा बळी घेतल्यानंतर नागपूर हे क्रांतिकारकाचे आश्रमस्थान बनले त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याच्या कटांच्या योजना आखून इंग्रजांची ससेहोलपट उडवून दिली. सुपरिटेंडेंट विश्वेश्वर सिंह यांच्या हत्येच्या वेळी नेमबाजीत कुशल असण्याऱ्या राजगुरूंनी अचूक टिपले पण दुर्दैवाने आझादांना त्यावेळी पकडण्यात आले. इंग्रजाच्या हातून मरण पत्करण्यापेक्षा त्यांनी स्वतः च डोक्यात गोळी झाडून आपला देह मातृभूमीच्या मांडीवर टेकवला. अशा प्रकारे स्वातंत्र्य सेनात युद्धाची आहुती देणारे चंद्रशेखर आझाद देशासाठी हुतात्मे झाले.