1683213
मादाम कामा
जन्म – २४ सप्टेंबर १८६१ मुंबई
मृत्यू – १९ ऑगस्ट १९३६
नाव – श्रीमती भिकाबाई रुस्तुम कामा
भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वतः जीवन पूर्णपणे समर्पित केलं त्या भिकाबाई यांचा जन्म मुंबईतील एका सुखवस्तू पारशी कुटुंबात झाला. पुढे त्यांचा विवाह मुंबईतील बॉरिस्टर रुस्टम कामा यांच्या बरोबर झाला. त्यांच्या पतींना इंग्रजाबद्दल आपुलकी वाटत असे तर याऊलट भारताचे स्वातंत्र्य कपटाने हिरावून घेणाऱ्या इंग्रज सरकारबद्दल बिमाबाईंना तिरस्कार वाटे. त्यामुळे पतीपत्नीत मत भेद होऊ लागले.
1683213