भगतसिंग
जन्म -७ सप्टेंबर १९०७ – बंगा (पंजाब)
मृत्यू -२३ मार्च १९३१ – ( फाशी )रणावीण स्वातंत्र्य कोणी मिळेना ৷
रणासाठी झाले स्वयंसिद्ध त्यांना ৷
जयी अर्पिली देशकार्यार्थ काया ৷
स्वातंत्र्यवरांस सदा नमू या ৷৷
स्वातंत्रासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यामधील भगतसिंग हे एक थोर हुतात्मे होते. त्यांच्या अगोदर घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी देशकार्यार्थ मरण पत्करले होते. आपल्या देशातील जनतेवर होत असलेला अन्याय अत्याचार अहिंसेने निपटून निघणार नाही, त्यासाठी क्रांतीच केली पाहिजे, क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे. अशी विचारधारा भगतसिंगची होती. पंजाबलालपुरा जवळील एका खेड्यात क्रांतिकारक कुटुंबात जन्माला आलेल्या भगतसिंगांनी आपल्या साथीदारानंसह इंग्रज अधिकाऱ्यांच्या अमानुष कृत्यास शिक्षा म्हणजे त्याची हत्याच असा ध्येयवाद जोपासून सुपरिटेंडेंट सॉडरच्या खुनाच्या योजनेत अपूर्ण माहितीमुळे दुसऱ्याच इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली पुढे इंग्रजांच्या भारतातील असेंब्लीत बॉम्ब टाकले. वेश पालटून त्यांनी देशकार्यार्थ जोमाने कार्य केले. शेवटी लाहोर कटाच्या खटल्यान्वये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांच्या ‘वंन्दे मातरम’ च्या नाऱ्यात फाशीच्या तख्तावर देखील बदल झाला नाही. यासारखे प्रखर देशप्रेम ते कोणते असणार?