
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म – १४ एप्रिल १८९१ – महू
मृत्यू – ६ डिसेंबर १९५६- दिल्ली
नाव – भीमराव रामजी आंबेडकरभारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समूह नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपडण्याऱ्या, झुंझार व्यक्तिमत्व असलेल्या महापुरुषाचे नाव होते – डॉ. बाबासाहेब आंबेटकर. ते लहानपणापासूनच हुशार, बुद्धिमान होते. पदवीधर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करून अमेरीकेला गेले. पुढे शिवाजी महाराजांच्या आर्थिक साहाय्याने लंडनला जावून बंरीस्टर झाले. त्यानंतर प्रक्टिसच्या निमित्ताने त्यांचा समाजाशी घनिष्ट संबंध आला, व त्यांनी त्यातूनच त्यांना जातीयतेच्या,भेदा भावाच्या रुक्ष कडा दिसू लागल्या.
हरिजनांचा उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूह उच्चाटणासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. महार येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले. अशा या महान दलितउद्धारकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने सम्मानित करण्यात आले.