अरुणा असफ अली
जन्म -१६ जुलै १९०९ कालका – बंगाल
मृत्यू -२९ जुलै १९९६सन १९४२ मध्ये महात्मा गांधींनी गोवालिया टंक मैदानावरून ब्रिटीश साम्राज्यशाही विरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा पुकार करताच, अवती भवती असलेल्या पोलिसांची पर्वा न करता हाती तिरंगा घेऊन ‘भारत छोडो’ च्या गगनभेदी गर्जना करणाऱ्या व आपलं पुढ्चं सर्व आयुष्य देशासाठी खर्च करणाऱ्या अरुणा असफअलींचा जन्म बंगालमधील काल्का या गावी एका कर्मठ कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव अरुणा गांगुली. त्या स्वतंत्रपणे विचार करण्याऱ्या होत्या.
डोळ्यांवर झापडं लाऊन पारंपरिक मार्गाने वाटचाल करणं हे त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी आई वडिलांच्या इच्छ्येच्या विरुद्ध प्रथम लाहोरच्या ख्रीस्ती मिशनरी शाळेत व नंतर नैनितालच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. देशासाठी काहीतरी करावं या उत्कट इच्छेनं अरुनांनी गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत वयाच्या १८ व्या वर्षी उडी घेतली. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या असफअली यांच्याशी त्यांची ओळख होऊन पुढे त्यांचा विवाह झाला.
पती आपल्याच विचारांचा लाभल्याने त्या राजकारणात हिरीरीने भाग घेऊ लागल्या. १९३० ते १९४१ या कालखंडात अटक, कारावास व सुटका या गोष्टी सतत चालू होत्या.
‘नुसते तुरंग भरून स्वातंत्र्य मिळेल’ ही गोष्ट पटेनासी झाल्याने १९४२ मध्ये म. गांधीजी इंग्रजांना ‘भारत छोडो’ हा इशारा दिल्यानंतर, पकडायल्या आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्या चार वर्ष भूमिगत राहिल्या.
१९४६ साली त्यांच्यावरचे पकड वॉरंट रद्ध होताच त्या प्रकट झाल्या. स्वातंत्र्यरोत्तर काळात १९४८ साली मध्ये त्या युनेस्कोच्या मेक्सिको येथील परिक्ष देस डॉ. रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून गेल्या.
१९५६ मध्ये त्या दिल्लीच्या त्या महापौर झाल्या. त्यांना ‘सोविएतल्यंड नेहरू पुरस्कार’, लेनिन पुरस्कार , इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबदल ‘नेहरू पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले.