अमर्त्य सेन
जन्म – इ. स. १९३३सध्या फार मोठ्या प्रमाणावर, विषेत: मागासवर्गीय राष्ट्रात उपासमार, भूकबळी, शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगारी, बेकारी यांचे फार मोठे थैमान चालू आहे. ‘अर्थस्थ पुरुषो दासः’ हे महाभारतकालीन सूत्र आहे. अडम स्मिथ हा या नव्या जगाचा पहिला अर्थशास्त्री. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता. त्यामुळे व्यापारी वर्गाने ‘औधौगिक क्रांती’ क्रांती घडवून आणली. राजेशाही,सरजामशाही, जमीनदार – सरदार – दरकदार घराण्यातील मंडळी व्यापारात शिरली. कामगारवर्गाचे पिळवणूक, शोषण या उद्योगपतीकडून होत असल्यामुळे कामगार क्रांतीचा नारा माक्र्सवादाने दिला.अर्थशास्त्राचा विचार नव्याने सुरु झाला. ‘अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र’? नावाचा ग्रंथ रस्किनने लिहिला. ज्यातील विचारामुळे महात्मा गांधीही प्रभावित झाले.
अमत्य सेन यांनी नव्या दुष्टीकोनातून स्वावलंबनाच्या दिशेने भारतीय किसान कामगारांच्या हितांचा विकास करणाऱ्या अर्थशास्त्राचा अभ्यास सुरु केला. भारताची शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाची अतिवृष्टी, अनावृष्टी यामुळे दुष्काळ पडतो हे गणितच चुकीचे आहे. ‘दुष्काळ’ हा मानव निर्मितच आहे,असा स्पष्ट सिद्धांत जगातील आणेवारीचा अभ्यास करून अमत्य सेन यांनी मांडला.
स्वातंत्र्योतर काळातील जनतेच्या विकासासाठी ज्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या, त्या पाश्चिमात्य दृष्ठीतून आखण्यात आल्या व पाश्च्यात्य दृष्ठीकोनातून भारत वा अन्य मागास देशांकडे पाहणे कसे चूक आहे हेही त्यांना दाखवून दिले.
दारिद्र्याचे मुल्यमापन कसे करायचे याबाबत अमत्य सेन यांनी स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. गणिताच्या मदतीने आकडेशास्त्र मांडले. देशाचे आर्थिक शास्त्र अबाधित ठेऊन व खाजगीकरण व राष्ट्रीयीकरण यांचा समन्वय साधून दारिद्र्य निर्मुलन कसे करता येईल याबाबत सर्वच पुर्वेकडील देशांना त्यांनी ‘चीनचे राष्ट्रीय आर्थिक धोरण’ अभ्यासून आपला देशचा विकास करता येतो याचे सोदाहरण विवेचन करून पाश्चात्य अर्थशास्त्रज्ञ व विचारवंत यांना मार्गदर्शनात्मक शोधप्रबंध तयार करून जगापुढे ठेवला. १८९८ सालचा नोबल पुरस्कार मिळविणारा हा भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ हा किताबही देण्यात आला.