Chakras & Nadis. Chakras. Knowledge of chakras is thought to have originated in India, and Hindu and Buddhist traditions have kept this awareness. the first step in Kundalini Yoga is the purification of Nadis. A detailed knowledge of the Nadis and Chakras, is absolutely essential. Prana energy operates in the body as an open system, which is not limited to the body s physical, mental or emotional systems.
प्राण विजय प्राप्ती !
सर्व साधारणपणे प्राणाचा श्वास व उच्छ्वास हा १२ अंगुले चालतो. हि प्राणाची गती प्रसंगपरत्वे कमी जास्त होते. गातेवेळी १६ अंगुले, भोजनकाळी २० अंगुले, गमन काळी २४ अंगुले, निद्राकाळी ३० अंगुले आणि मैथुन काळी ३६ याप्रमाणे बदल होतो.
हि जी प्राणवायूची १२ अंगुलाची गती आहे. त्यातील एक एक अंगुल योगाने गतीयोग अभ्यासाने कमी केल्यास -निष्कामता प्राप्त होते. २ अंगुले कमी केल्यास आनंद प्राप्त होतो. ३ अंगुले कमी केल्यास कवित्व शक्ती प्राप्त होते, ४ अंगुले कमी केल्यास वाचा सिद्ध होते, ५ अंगुले कमी केल्यास दूर दृष्टी प्राप्त होते, ६ अंगुले कमी केल्यास आकाश गमन होवू शकतो. ७ अंगुले कमी केल्यास प्रचंड वेग, ८ अंगुले कमी केल्यास सिद्धी प्राप्त होते, ९ अंगुले कमी केल्यास नवनिधी प्राप्ती, १० अंगुले कमी केल्यास दशमुर्तीत्व (म्हणजे अनेक रूपे धरण्याची विद्या), ११ अंगुले कमी केल्यास स्वयंतेज प्रकाश (म्हणजे छाया नाहीशी होणे) आणि १२ अंगुले असलेली प्राण वायूची सर्व गती जिंकल्यास -हंसगती व गंगामृताचे प्राशन होते म्हणजे तो प्राणवायू नखशिखांत पूर्ण होत असल्या कारणाने त्याचे त्यासच सत्रावीचे – अमृतपान होवून मग खाण्यापिण्याची गरजच राहात नाही. असा हा सर्व कार्यात फलप्रद प्राणविधी आहे. हि ‘प्राण सिद्धी’ कुंभक व ध्यान धारणेने श्वासाची गती कमी होत जाते. त्यामुळे ‘प्राण सिद्धी’ प्राप्त होते. चित्ताच्या एकाग्रतेमुळे श्वासाचे बाहेर जाणे व आंत येणे सूक्ष्म व सुक्ष्मांतर होत जावून शेवटी प्राण सुशुम्नेत गती शून्य होतो.
शरीरातील मुख्य नाड्या तीन त्यावर शरीरातील मदार आहे. शरीराचे आरोग्य व कार्य स्फूर्ती यावरच अवलंबून असते. यात बिघाड झाल्यास देहाचे आरोग्य बिघडते. देहा मध्ये ज्या तीन नाड्या आह्रेत त्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या होत. त्याचा प्रत्यक्ष संबंध मेंदूशी व हृदयाशी आहे. ह्या नाड्या प्राणाशी अगदी निगडीत असून त्यांचा संबंध नाकाच्या उजव्या व डाव्या नाकपुड्याशी आणि त्यातून वाहणार्या प्राण वायूशी अगदी निकट आहे नाकपुडीतून वाहणारे वायू यांना ‘स्वर’ किंवा ‘नाडी’ म्हणतात.
उदा-: ‘नाकाला सुत लावून घरातील माणसे बसली आहेत’ असा वाक्प्रचार आपण नेहमीच एकतो. याचा अर्थ असा कि,श्वाशोश्वास मंद होत असून प्राण केव्हा जाईल याचा नेम नाही. यावरून आयुष्याचा प्राण वायुशी संबंध आपोआप सिद्ध होतो. * डाव्या नाकपुडीतून जेव्हा प्राण किंवा स्वर वाहतो तेव्हा त्याला ‘इडा’ ‘गंगा’; किंवा ‘चंद्र स्वर’ इ. नावे आहेत. ह्यांनाच जीवन स्वर असे म्हणतात. * उजव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर वाहतो तेव्हा त्याला ‘पिंगला’ ‘यमुना’ किंवा ‘सूर्य स्वर’ म्हणतात. जेव्हा दोन्ही स्वर चालू असतात किंवा वारंवार व क्षणाक्षणाने बदलतात तेव्हा त्याला ‘सुषुम्ना’ असे संबोधीतात.* कोणत्याही नाकपुडीतून एक स्वर जोपर्यंत पूर्ण वाहात नाही. ती विपरीत किंवा अशुभ नाडी समजावी. ती कार्य सिद्धीस नेत नाही. पण अश्या नाडीची अस्थिर स्थिती धारणेस व ध्यानास उपयोगी पडते. हे विशेष ध्यानात घेण्या जोगे आहे. अश्यावेळेस चित्ताची एकाग्रता लवकर होते. हि ; सुषुम्ना’ जाणणे अतिशय अभ्यासाचे व चिकाटीचे काम आहे. क्षणाक्षणाने पालटनार्या स्वरावर कोणी प्रश्न केला किंवा गमन केले तर प्रश्न सिद्धीस जात नाही. व प्रवासात संकटे ओढवतात दु:ख पदरी येते. * चंद्रनाडी शीतल, सूर्यनाडी उष्ण व सुषुम्ना फक्त ईश्वर आराधने करिताच आहे. हि सुषुम्ना नाडी ती शंभू स्वरूप व प्रलयकारी असून प्रापंचिक कार्यास अशुभ व अहितकारी आहे. * इडा, पिंगला व सुषुम्ना या नाड्यास अनुक्रमे गंगा, यमुना व सरस्वती अश्याही संज्ञां आहेत. *चंद्र स्वर चालू असताना पुर्नांगा कडील (म्हणजे पूर्ण स्वर वाहतो त्या बाजूचा )डावा हात स्नानाच्या पाण्याच्या बुडवून ज स्नान करील त्याला गंगेच्या पाण्याने स्नान केल्याचे पुण्य मिळते. तसेच सूर्य स्वरावर चालू असताना पुर्नागाचा हात पाण्यात बुडवून ते पानी अंगावर घेतल्यास यमुनेच्या पाण्याचे स्नान केल्याचे फल प्राप्त होते. आणि सुषुम्ने वर स्नान केल्यास ‘त्रिवेणी’ संगमावर स्नान केल्याचे पुण्य पदरी पडते. शरीर क्षेत्रात नाड्या ह्याच नद्या व ‘त्रिवेणी’ संगम हीच पर्वणी जाणावी.
चंद्र नाडी : (चंद्र नलिका )
चंद्र नाडी वरील अनुमाने:- एखादा मनुष्य किंवा वस्तू हरविली असल्यास आपल्याला कुणी प्रश्न केल्यास तेव्हा आपली चंद्रनाडी सुरु असेल तर तो लवकर परत येईल असे निश्चित समजावे. बाहेर गेलेला घरी येण्यास वेळ लागेल पण तो येत आहे, वा लवकर येईल असे समजावे. आणि क्षणा क्षणात नाडी बदलत असेल तर तो तेथेच अद्याप आहे, निघाला नाही असे समजावे. पण चंद्र नाडी स्थिर झाली तरी तो काही वेळाने परत येईल असे समजावे. याउलट प्रश्न करताना सूर्य नाडी चालू असेल तर तो लवकर येण्याची आशा व्यर्थ होय, नाडीच्या स्थिरतेत कार्य त्वरित होईल का विलंबाने हे कळते.
चंद्र स्वरावर कार्य सिद्धी झटपट यशस्वी होते. * चंद्र नाडी चालू असताना जर जेवण केले तर पचनशक्ती पाहिजे तशी तीव्र राहात नाही. कारण डावा स्वर शीत स्वभावी आहे. अश्या वेळी भोजना नंतर स्वर बद्लावयाचा असेल तर डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे उजवी नाडी (सूर्य स्वर) चालू होईल. त्यामुळे अपचनाचे पुष्कळसे विकार आपोआपच बरे होतील. (भोजनोत्तर वामकुक्षी करावी हि प्रथा याच हेतूवर आधारित आहे )
चंद्र नाडीवर करावयाची कार्ये-डाव्या नाकपुडीतून वाहणारी जी ईडा नाडी म्हणजे चंद्र नाडी हि अमृत वर्षिनी असून ती सर्व स्थिरचर व मंगल कार्ये करण्यास प्रशस्थ होय. *शुभ कार्ये चंद्र नाडीत अधिक फलप्रद होतात. कोणत्याही कार्यात प्रगती व यश मिळते. या इडा नाडीचे दैवत चंद्र आणि शक्ती दैवी असून पुरुष वर्ग व गंगा नदी आहे.
सूर्य नाडी : (सुर्य नलिका)
सूर्य नाडी वरील कार्ये :- उजव्या नाकपुडीतून श्वास वाहत असेल तेव्हा, शत्रू नाश करणे, परदेशात व्यापार करणे, नौकेत बसने, अश्व, गज, रथ यावर बसने, यंत्र, तंत्र किल्ला, पर्वत, जंगल, झाड, भयंकर जागी गमन करणे, युद्ध करणे, भोजन करणे, स्नान करणे, साधू, संत, राजा, अमीर यांची भेट घेणे, लेखन कार्य, भाषण करणे, निद्रा घेणे, नदी तलाव पोहणे, असाध्य रोग निवारणे, कर्जावू पैसे घेणे, क्रूर प्राण्यांवर वर्चस्व गाजविणे, कुस्ती करणे, यश मिळविणे, तंत्रादिसाधने करणे, ताईत तयार करणे, सावकारी करणे हि किंवा याप्रकारची कार्ये या स्वरावर करावी. सूर्य स्वर चालू असताना कोणी तुम्हास प्रश्न केला असता प्रश्न करणार्याचे मन चंचल झाले असे समजावे. या पिंगला नाडीचे दैवत सूर्य व शिवदेव असून स्त्री वर्ग व यमुना नदी आहे.
सुषुम्ना नाडी: (सुषुम्ना नलिका)
इडा, पिंगला, या दोन नाड्यांचे संक्रमण अडीच घटकेचे (म्हणजे एक तासाचे )अंतराने होते. कधी कधी हे दोन तासानीही होते. निरोगी व स्थिर वृत्तीच्या माणसाचे हे संक्रमण एक एक तासाचे असते, पण तरी या शास्त्राचे जाणकार दोन किंवा अडीच तासांचे संक्रमण अशुभ व अहित मानीत नाहीत. त्याही पेक्षा जास्त अवधीचे संक्रमण व्याधीकारक व संकट सूचक असते. दोन नाड्यांच्या संक्रमण काळाला ‘संध्याकाल’ म्हणतात. संध्याकाल हा सुशुम्नेचा ‘सूक्ष्मभाग’ होय, हा संधीकाल जाणणे अति महत्वाचे होय.*स्वर शास्त्रात सुषुम्ना ह्या नाडी ला दुष्ट नाडी म्हणतात. कारण व्यवहारातले कोणतेही शुभ कार्ये या स्वरावर केली असता अयशस्वी होतात.फक्त अत्यंत क्रूर कर्म किंवा योगाभ्यास करावा. शुण्यनाडी म्हणजे नाडी म्हणजे स्वरावर सो:हम जप किंवा ध्यानयोग साधना केल्यास चित्ताची स्थिरता त्वरित होवून प्राण धारणा झाल्याने कुंडलिनी शक्ती त्वरित जागृत होते कोणताही स्वर बदलण्याच्या संधी काळाला सुषुम्ना असते. जेव्हा श्वास एका क्षणात एका नाकपुडीतून व ताबडतोब दुसर्या क्षणात दुसर्या नाकपुडीतून वाहात असेल तेव्हा सुषुम्नानाडी किंवा शून्य नाडी समजावी दोन्हीही स्वर सुरु असतात तेव्हाही शून्य नाडीच जाणावी. सुर्याचा चंद्र वारंवार होणे हि सुषुम्ना फार अशुभ इडा व पिंगला या दोन नाड्यान मधील सुषुम्ना नाडीतसेच चंद्र व सूर्य स्वर एकाच वेळी चालत असेल त्यावेळी मौन धारण करून बसावे.