वंडरलँण्ड फिल्म्स घेऊन येत आहे… “कमिंग सून”




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Cast and Crew of Movie Cooming Suun:

Stars:  Adinath Kothare, Neha Pandase, Jitendra Joshi, Vijay Patkar, Resham Tipanis, Suhas Joshi, Anchal Potddar.
Date: 2014.
Director: Ankur Kakatkar.
Producer: Anupkumar Potddar, Sanjay Sakala, Aman Widhate and Mulchand Dediya.

मनोरंजनासह प्रेमकथेचा आविष्कार व दिग्गज कलाकारांचा भरणा…म्हणजे “Coming सून”. चाकोरीबाहेरील विषय हाताळून प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल अशा संकल्पना आपणास सध्या मराठी चित्रपटाश्रुष्टीत पहायला मिळत आहेत. आपल्या मराठी चित्रपटांची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर आज होत आहे आणि मराठी चित्रपट एक वेगळ्या वळणावर उभे आहे. आशयघन चित्रपटांसह निव्वळ मनोरंजन आणि प्रेमकथा असणा-या चित्रपटही प्रेक्षकांची तितकीच वाहवा मिळवत आहेत व तिकीटबारीवर हिंदीला टक्कर देत आहे. सध्याची युवा पिढी आवर्जून मराठी चित्रपट पहायला अगदी पहिल्याच दिवशी हजेरी लावतात आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच वंडरलँण्ड फिल्म्सतर्फे प्रेक्षकांसाठी “Coming सून ” या अशाच एका दर्जेदार मनोरंजनात्मक प्रेमपटाची मेजवाणी अपना करिता घेऊन येत आहे.

“Coming सून ” या चित्रपटाचे निर्माते अनुपकुमार पोदार, संजय संन्कला, अमन विधाते, मुलचंद देढीया करत असून दिग्दर्शन अंकुर काकटकर करणार आहेत. मंनोरंजनासह प्रेमाची जुगलबंदी करण्यासाठी मराठीतील आघाडीचे कलाकार आदीनाथ कोठारे( Adinath Kothare) , नेहा पेंडसे (Neha Pandase), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), विजय पाटकर (Vijay Patkar) , रेशम टिपणीस (Resham Tipanis), सुहास जोशी (Suhas Joshi), आचंल पोद्दार (Anchal Potddar), आदीं या चित्रपटात मुख्य भुमिका साकार करत आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय कुलकर्णी (Chinmay Kulkarni) यांनी लिहिले असून संकलन संजय संन्कला करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई-पुण्यासारख्या शहरी ठिकाणी होणार असून सध्या पुण्यातील राजगुरूनगर येथे चित्रीकरण सुरू आहे. Coming सून लवकरच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.. सो तोपर्यत वाट पहा… Coming सून !. या चित्रपटाचे काही मोलाचे क्षण आपण पाहू शकता .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu