नेमक काय घडल.. कस मृत्यूनी मुंडेंना कवटाळले या बद्दलची सर्व माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर वाचा त्या दिवशी नेमक काय घडल ते. गोपीनाथ मुंडे औरंगाबादला जाण्यासाठी लोधी इस्टेटमधील निवासस्थानातून मारुती सुझुकी एसएक्स ४ या गाडीतून विमानतळाकडे निघाले. सकाळच्या ट्रॅफिक नसलेल्या वेळेत कमाल अर्धा तासाचा प्रवास. त्यांचे सचिव नायर त्यांच्यासमवेत होते.
सकाळी ६ . २०
पृथ्वीराज रोडवरून सफदरजंग रोडकडे जाताना अरविंद मार्गावरून आलेल्या इंडिका गाडीची धडक.
अपघातस्थळावरील ती १० मिनिटे
चालकाच्या मागील सीटवर डाव्या बाजूला मुंडे स्थानापन्न होते. नेमकी त्याच बाजूला गाडीची धडक बसली. त्यामुळे मुंडे गाडीतच फेकले गेले. या धडकेचा आघात मोठा नसला, तरी मुंडेंना मात्र त्याचा जबरदस्त शॉक बसला. अपघातग्रस्त गाडी त्याच चौकात बाजूला घेण्यात आली. मुंडेंनी स्वतः आपले सहकारी व चालकाच्या तब्येतीची विचारपूस केली. गाडीची फारशी हानी झाली नव्हती. त्यामुळे आधी विमानतळावर जाऊ. त्यानंतर पुढील प्रवास हा दोन-अडीच तासांचाच आहे. दुखापतीचे नंतर पाहू, असा संवाददेखील त्यांच्यात झाला. गाडीमध्ये बसलेल्या मुंडेंनी पाणी मागितले. ते घेतल्यानंतर मात्र मुंडेंची अस्वस्थता वाढली. त्यांनी चालकाला लवकरात लवकर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये गाडी नेण्यास सांगितले. त्यानुसार, पाचच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये गाडी नेण्याचे नियोजन झाले. मात्र, ही क्षणांतच मुंडेंची शुद्ध हरपली आणि ते कोसळले.
सकाळी ६.३०
मुंडेंना अत्यवस्थ स्थितीत ‘एम्स’मध्ये आणले गेले. त्यांच्या रक्तदाबासह हृदयाची गती खूपच खालावलेली होती. त्यानंतर पुढील ५० मिनिटे वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार करून बंद पडलेली हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
सकाळी ७.२०
वैद्यकीय पथकाच्या उपचारांना मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही. अखेर, डॉक्टरांनी अधिकृतरीत्या मुंडे यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींनी ‘एम्स’ला धाव घेतली. त्या ठिकाणी, वैद्यकीय पथकासमवेत चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकारासंदर्भात माहिती दिली. तसेच, डॉ. हर्ष वर्धन यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला.
सकाळी ८.५५
गडकरी यांनी मुंडे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
अधिक माहिती करिता आपण http://maharashtratimes.indiatimes.com वरील लेख वाचू शकता. Image Source.
1 Comment. Leave new
Kahi Lok Mhantat Ki Gopinathana Marl gel asel…. Afwa asnar hi…