सेवाभाव आणि सेवा !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
Birth of meaningful human
Birth of meaningful human

Your service should be which is organized for the purpose of social, fellowships, educational and literary societies and community services. Do not expect anything while giving service.  Social service is nothing but a Birth of meaningful human.

मनुष्य जन्माची सार्थकता .

आम्ही संसाराच्या संयोगा शिवाय राहू शकतो. पण विभागा शिवाय राहू शकत नाही ,जीवन जगू शकत नाही अर्थात संसारातील वस्तू व्यक्ती आणि पदार्थ यांच्याशी संबंध ठेवून आपल्याला सुख मिळत नाही. जितके सुख यांच्या वियोगाने मिळते, आपण म्हणू की हे कसे शक्य आहे. ते असे की जशी आपल्याला गाढ झोप येते. तेव्हा त्या झोपेत कुणी व्यक्ती, वस्तू यांच्याशी मात्र आपला किंचित मात्र संबंध राहात नाही सर्व वस्तू,व्यक्ती यांना आपण पूर्ण:विसरून जातो. त्या विसरण्यात जितकी सुख शांती मिळते तितकी शांती -सुख त्यांच्या आठवणीने सुद्धा मिळत नाही. झोप हि तर आपली जन्मजात प्रवृत्ती आहे आपण सर्वच जन्मा पासून तर मृत्यू पर्यंत झोप घेत असतो, तेव्हा तेवढ्या  पुरता आपला संसार विसरतोच की नाही ? संसारापासून विमुख झाल्याशिवाय आम्ही आठ प्रहर सुख पूर्वक जिवंत राहू शकत नाही, ईतकेच नाही तर काही दिवस जर आपल्याला लागोपाट झोप आली नाही तर माणूस वेडा होईल म्हणजेच झोपेने जीवनाला जी स्वस्थता जीवनाला मिळते तितकी स्वस्थता पदार्थ किंवा व्यक्तीच्या संबंधाने मिळणार नाही. उलट व्यक्ती आणि पदार्थ यांच्याशी जितका जास्त संबंध असेल,तितकी मनाला आणि शरीराला थकावट झोपेने नष्ट होते. झोपेमुळे शरीराला इंद्रियाला अंत:करणाला नवी शक्ती, स्फूर्ती मिळते.उलट पदार्थ, व्यक्ती त्यांच्याशी जास्त संबंध राहिल्याने उत्साह व शक्ती यांचा र्हास होतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu