सुविचार- सकारात्मकतेतील पावित्र्य !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Importance of PositivityImportance of Positivity: Positivity is staying positive even when you find a really good reason to be negative. What positivity means for you? Is it simple idea behind positive energy. Read this article with and understand positivity.

सुविचार- सकारात्मकतेतील पावित्र्य !

सकारात्मक बनणे आवश्यक आहे. प्रेम भावना  मनात उत्पन्न झाली कि तुम्हाला जाणवले असेल कि नकारात्मक विचार नाहीसे होतात. ईतकी शक्ती या प्रेम भावनेमध्ये असते. हे बघा, आपण कुठून बाहेरून घरात येतो. बाहेरच्या कटकटीने मन कसे त्रासून गेलेले असते. बर्याचवेळा बाहेरील लोकांच्या वाकड्या वागण्यामुळे जिवाचा संताप झालेला असतो. अश्या अवस्थेत घरात आल्यावर जर बाहेरच्या खोलीत एखादे लहान बाळ खेळत असलेलं पाहिलं तर त्याच्या निरागस हसण्यापुढे असलेला संताप क्षणाधार्थ वितळून जातात. व मन एकदम प्रफुल्लीत होतं. त्या बाललीलांमध्ये मन कधी रमत हे लक्षात सुद्धा येत नाही. कारण ते निरागस बालक पूर्णपणे सकारात्मक असतं त्याला कोणतेही विकार जडलेले नसतात. त्याच्या जवळ जे असतं ते स्वर्गीय असतं कि ते इतक पवित्र असतं कि तुमच्याकडे प्रतिबिंबीत होऊन तुम्हाला सकारात्मक करण्याची शक्ती त्यात असते.

—————————————————————————————————–

कृतज्ञता एक उच्च दर्जाची भावना !

स्व्च्छ, सुंदर, नितळ अशी प्रेम भावना हि किती सकारात्मक असते याच अनेकवेळा आपल्याला प्रचीती येते, त्याचे दृष्य परिणाम आपण पाहू शकतो. कारण प्रेम भावना हि स्वर्गीय असते. त्यमुळे त्यातून मिळणारे परिणाम हे चांगलेच असतात. अशीच एक भावना कृतज्ञता ! प्रेमभावना जशी नितळ,स्वच्छ असते तशी कृतज्ञता हि भावना म्हणजे फक्त प्रामाणीकपणा . ज्या कोणाकडून तुम्हाला काही मिळतं, ते मिळण म्हणजे ईश्वराचचं देण असतं तेव्हा अश्या देणाबद्दल देणाऱ्यासाठी कृतार्थ व्हायलाच हवे. त्याच्या देण्यातून तुम्ही जे सुख उपभोगता त्यासाठी कृतज्ञ होणे म्हणजेच सुखाची पावती देण्यासारखेच आहें. फक्त माझ्यामुळेच नाही तर तुझ्या कृपेने हें घडतं आहे अशी अहंकारशून्यत्वाची प्रामाणिक कबुली म्हणजे कृतज्ञता. ही एक मनाची उच्च दर्जाची भावना असल्यामुळे ती सकारात्मकच असणार.

—————————————————————————————————–

सकारात्मक बना — कृतज्ञ व्यक्तीला मदत करण्यातील आनंद !

 तुमची इच्छा ही एक अतिशय प्रबळ अशी शक्ती आहे. फक्त अपेक्षित इच्छा हि सकारात्मक असेल तरच ती प्रभावशाली ठरते. त्यासाठी चांगल्याच गोष्टीची अपेक्षा करा. जी गोष्ट नकारात्मक आहे. आणि दुसर्यांचे वाईट चिंतणारी आहे तिची अपेक्षा धरु नका. कृतज्ञता हि भावना मनाची शक्ती वाढवणारी, मनाला योग्य मार्गाने नेणारी आणि अपेक्षित गोष्टी जीवनात प्राप्त करून देणारी एक प्रक्रिया आहे. साहजिकच आहे, जस एखाद्याला आपण मदत केली, त्यानंतर ती व्यक्ती कृतज्ञ राहिली तर त्याला पुन्हा मदत करायला आपणास आनंदच वाटतो, पण ती व्यक्ती कृतघ्न झाल्यास आपण तिचा विचारही करणार नाही हाच नियम ब्रम्हांडातून मिळणार्या प्रतिसादालाही लागू पडतो. तेव्हा जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता अवश्य व्यक्त करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu