संत कबिरांचे सामाजिक नेतृत्व




Like
Like Love Haha Wow Sad Angry
53

Sant Kabir Social Good WellKabir’s legacy is today carried forward by the Kabir Panth (“Path of Kabir”), a religious community that recognizes him as its founder and is one of the Sant of Indian History. Read this article about Good Wells Sant Kabir.

संत कबीर हे निर्भीड मनोवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी सत्ताधारी लोकांच्या भोगविलासी प्रवृत्तीला तीव्र विरोधच केला. तसेच विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडाणी काहीही साध्य होत नाही असेच त्यांचे स्पष्ट मत होते. तीर्थ यात्रा करणे, गंगेत स्नान करणे, माला गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे, या सर्व गोष्टी निरर्थक असल; याचे ते सांगत. त्यांना मानवता हाच धर्म महत्वाचा वाटायचा, सर्व प्रथम मानवी मनाची भ्रांतीच दूर व्हायला पाहिजे, माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. सदभाव, अहिंसा, सत्य, सदाचार, परोपकार, शील हि मानवतावादी नैतिक मुल्ये सतत आचरणात आणण्याचा आग्रह कबीरांनी आपल्या विचारांत मांडलेला आहे. तसेच प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे ते आपल्या साहित्यातून सांगतात. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे संत कबीर हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्चनीचते खाली प्रखर विरोध करतात. आणि मानवीसमाजा मध्ये उच्चनीचतेचे कृत्रिम-स्तर निर्माण करणाऱ्या जातीयतेला मुठ-मातीच देतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
53




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu