आजच्या जपातून!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

How to get God with prayer. we can win the god with your prayers. this is great source of winning god. from our ancient era this Tradition is continue. monsters like Ravan wins God just because of their prayers. this article is something about prayer and God.

ishwarbhakti

साक्षित्व म्हणजे म्हणजेच जाणणे, देव कर्ता आहे, आपण नुसते निमित्त मात्र आहोत, अशा भावनेने जाणीवेने सोहं अनुसंधानात सर्व कर्मे निपुणतेने, कुशलतेने करीत जाणे व संसारातील सर्व व्यवहारात सहजगत्या जणू नाटकातील नटा  प्रमाणे साक्षित्वाने वागणे, असे वाहताना सुख-दु:खाच्या नाना स्वरूपाच्या प्रसंगातहि तोंड द्यावे लागतील. त्यास न डगमगता सोहं अनुसंधानाणे जणुकाय नाटकात कामे करणाऱ्या नटा सारखीच जडण-घडण व्हावयास पाहिजे. एकच नट निरनिराळ्या नाटकात निरनिराळ्या भूमिका कशा कुशलतेने वठवीतो. कधी संत ज्ञानेश्वराची, तर कधी शिवाजीची, कधी वैराग्याची तर कधी कुशल संसारीकाची, कधी रामाची तर कधी रावणाची अगदी त्याच प्रमाणे साधकाने संसारात प्रालब्धवशात त्याला ज्या ज्या म्हणून भूमिका कराव्या लागतील त्या त्या सर्व भूमिका भक्तियुक्त सोहं अनुसंधानात अगदी सहजपणे वठवावयास पाहिजे.

सोहं च्या अनुसंधात सोहं स्मरणाने आपल्या स्वरूपाची जाणीव ठेऊन आणि देहच सर्व नाटक करतो आहें व मी ह्या देहाहुन अंतर्यामी सोहं निराळाच आहें. अशी भावना करून साधकाने सर्वकाळी सर्व व्यवहार सहजगत्या करावयास शिकले पाहिजे,नव्हे तसे व्यवहार साधकाला करता आले पाहिजेत. आणि निष्ठा व प्रेम धेनु वत्सावत असावयास पाहिजे. जणू गाय रानात चरावयास गेली तर तिचें वासरांवरील प्रेम जसें रानात जात नाहीं तर ते गोठ्यातच वासरा भोवती असतें. तद्वतच आपण कोठेही व कसल्याही व्यवहारात असो साधकांच्या अंत:करणातील जाणीव सतत सोहं स्मरणात गुंतलेली व रमलेली आणि स्वस्वरूपात गुरफटलेली असावयास पाहिजे. हेच साक्षित्व — ते देहाभिमाणू सांडूनी, गुणकर्मे ओलांडूनी, साक्षिभूत होऊनी वर्ततीदेही || (ज्ञाने )

मी कोण ?

भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात–: ईश्वर सर्वत्र व्यापी आहें, तो सोहं परमात्मा सर्वांच्या हृदयात निरंतर वास करतो. आणि या जड देहाकडून यंत्रवत काम करवून घेतो. हृद्य गुहे मध्ये प्रत्यक्ष ब्रम्ह हेंच ” मी मी..  हाच सोहं, सोहं आत्मरूपाने अहर्निश अखंड घोष करीत प्रकाशत आहें. म्हणून एकाग्र मनाने तू स्वत:च्या हृदयातच स्वत:चा शोध कर, तेथेच बुडी मार, स्थिर हो, ‘मी मी, म्हणून ज सर्व प्राणी मात्रांच्या-मनुष्यमात्रांच्या नाका-मुखातून सर्वत्र समान सोहं, सोहं एकच उच्चार होतो. “तोच मी “!

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu