पारिवारिक पूर्णता…




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Completion of Family: How family member are, Family structure of Indian families, How families complete in India, read about Indian Families. Indian Families are dived in various types. even in single family we found different natures of people.

स्वर्गसुंदर घर त्यात असायला हव प्रेम.

Tips for Family Historyआपले महत्वपूर्ण नाते कुणाशी आहे. आपण आपले जीवन आनंदाने जगत आहोत तर कुणापासून आपल्याला सुख प्राप्त होत आहे.आनंद मिळत आहे.हे आत्मीयतेने विचार केले पाहिजे. आपण त्यांच्या साठी काय करीत आहोत. त्यांना आपण वेळ देत आहात काय? कि आपण त्यांना नजरअंदाज तर करीत नाही नां? त्यांना खुश ठेवत आहात नां! आपल्या महत्वपूर्वक वेळेतून त्या महत्वपूर्ण व्यक्तींना वेळ दिलाच पाहिजेत. या सर्व गोष्टीचे महत्व परिवारात आणि नात्यांत फार मायने ठेवतात. तसेच आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी व सुखी जीवनासाठी नाते जपणे अत्यावश्यक आहे. नात्यातील दुरावा हा मनुष्याला कधीच सुखी ठेवू शकत नाही. काही क्षण हे दुरावे बरे वाटतात पण यात नकळत अतिशय नुकसानही होत असते. हे आपल्या लक्षात येत नाही.

 नात्यातील तालमेल…

सर्वांचा दृष्टीकोन समान नसतो. आणि तो समान करण्याचा प्रयत्न देखील करू नये. यात दु:खच आहे. आपल्या प्रत्येक नात्यातील व्यक्तीसोबत पूर्णता: असली पाहिजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी समजून घेऊन बोलचाल केली पाहिजे.त्या शिवाय अडचणी, समस्या समजू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी मौन राहून चालणार नाही. यामुळे नात्यातील महत्व कमी होवून तिरस्काराची भावना प्रगट होते. मनुष्य कधी कधी गैरसमज करून घेतो कि बोलचालिने कुणी आपल्या कडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवतो हि फार चुकीची समज आहे. असा गैरसमज कधीच ठेवू नये

कदाचित आपले दोष कुणी काढत असेल तरी त्याला आपला नादान गुरु समजून त्याचा विरोध न करता त्यातून समज घेतली पाहिजे. त्यांचा द्वेष न करता त्यांच्या शब्दातून काय अर्थ निघतो हे समजून घेतले पाहिजे त्यांना टोकणे  म्हणजे आपल्या सुधारणेत अडथळा केल्यासारखे होईल. त्यांच्यामुळे आपल्यातील अज्ञान दूर होतात. नादान गुरु मुळे आपली मन दुखतात,टेन्शन येतात पण आपल्यात सुधार होतो.

पारिवारिक  संदेश  – (मिटिंग ट्रेनिंग कल्चर)

परिवारात घरी एक सार्वजनिक हॉल हवा जेथे घरातील सर्व मंडळी एकत्रित बसून विचार करू शकतील.

परिवारात प्रत्येकात वेगवेगळी सोच असते.

१-  कुणी प्रथम बोलतो नंतर विचार करतो.

२- कुणी प्रथम विचार करतो, नंतर बोलून दाखवितो.

३- कुणी विचार खूप करतो पण बोलून दाखवीत नाही.

४- कुणी बोलतच जातात पण विचार मुळीच करीत नाही, याप्रमाणे तेव्हा परिवारात प्रत्येकाच्या स्वभावाचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.  परिवारात प्रत्येकाने एकमेकांशी संवाद करणे जरुरीचे असते. त्यामुळे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला माहिती असणे तेवढेच आवश्यक आहे.  यामुळे घरात काही समस्या, एकमेकांतील गैरसमजुती सुलझण्यास मदत मिळते. कुणाचा स्वभाव किंवा विचार चुकीचे वाटत असले तरी त्याला आचार विचारात बसविणे आवश्यक आहे,त्याला नजर अंदाज करू नका. आपल्याला एखादे वेळी बाहेरील व्यक्तिं मध्ये बैठक करण्याची असल्यास त्या अविचारी व्यक्तीकरीता समजण्याकरीता काही खाणाखुणा( रिमांइन्डर) किंवा एक्शन ठेवा कि तो समजू शकेल कि मला बोलायचे नाही वै. कारण कधी कधी छोटासा इशारा मोठे काम करतो. व त्याचे मन दुखणार नाही. तसेच एकमेकांच्या बोलचालित सॉरी, प्लीज, मी चुकीचे बोलून गेले, माफ करा हे शब्द असणे आवश्यक आहे. यामुळे अहंकार मिटतो.

१-  जवळ घेणे, पाठ थोपटणे या मुळे पिवारात शांती, आनंद बनून राहतो.

२-  आपल्या परिवारातली ख़ुशी, आनंद कमी होत असल्यास त्यावर विचार करणे.

३-  दुसर्या परिवारा सोबत कॉमपलिकेशन असेल तर त्यांच्या समोर काय करायचे तेव्हा आपल्या परिवारात सर्व सदस्यां सोबत काही शब्द तयार ठेवा आणि रिमाइन्डर ठेवा, (समोरच्या व्यक्तींचे स्वभाव समजून )

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा