Why we need Common sense? Common sense is a basic ability to perceive, understand, and judge things, which is shared by (“common to”) nearly all people, and can be reasonably expected …
प्र. मनुष्य आजारी असल्यास त्या आजारपणात आत्मसूचनांचा प्रयोग कसा करावा.
आजारात औषध्यांद्वारे इलाज होतच असतो. पण त्या आजाराला शुभ विचारांची जड मिळणे आवश्यक असतं. आत्मसुचना म्हणजे एखादा विचार मनातल्या मनात किंवा मोठ्यानं म्हणण. आजाराच्या उपचाराबरोबर मनाच्या शक्तीला औषधाच रूप देण्यासाठी प्रेमाने आणि दृढ विश्वासाने पुढील वाक्य म्हणावे —
१. ‘मी ठीक होत चाललो आहें.. मी स्वस्थ होत चाललो आहे… माझे काही त्रास होते ते ठीक होण्याच्या मार्गावर आहेत… प्रत्येक क्षणी.. प्रयेक दिवशी..उपचारान माझ शरीर उत्तम होत आहे..’
हा सुविचार सतत आपल्या मनात ठेवावा, त्याच बरोबर माझ मनोशरिर यंत्र प्रत्येक पद्धतीने ठीक आहे.
* मी ईश्वराची संपत्ति आहे, कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ‘हे वाक्य मनापासून म्हणत रहावे,, यामुळे आजारांच्या विचारां पासून आणि भीती पासून मुक्तता मिळेल.
२. सकारात्मक विचार शक्तीचा उपयोग अवश्य करावाच पण आजाराच नेमकं कारण जाणून घ्यायला हवं आपल्या कोणत्या चुकीच्या सवयी, चूकिच्या विचारांमुळे असल आजारपण आले हे लक्षात आणायला हवं. कारण विकार आणि विचार हे दोन्ही कारणीभूत असू शकतात. हि समज ठेवून आत्मसूचना द्वारे ते विचार नष्ट करा. आणि हे म्हणा…
* ज्या चुकीच्या विचारप्रवाहांमुळे हि स्थिती निर्माण झाली आहे त्या विचार प्रवाहाला मी सोडण्यास तयार आहे. या विचाराने तुमच्या मनात विचारांची नवी बैठक तयार होऊन त्या रोगापासून तुमची सुटका त्वरित होईल,
* या नवीन वैचारिक बैठ्कीला प्रबळ स्थान देण्यासाठी पुन्हा पुन्हा उच्च्यारा’ माझा चुकीचा विचारप्रवाह सोडल्यामुळे मी स्वतंत्र आहे.. मी मुक्त आहे.. मी आनंदी आहे … मी निरोगी आहे..
* माझ्यात ठीक होण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी कल्पना करा व ठीक होण्याचा अनुभव करीत शांत व निपचित पडून राहा.