विशाल मेगामार्टची इमारत जप्त होणार

Like Like Love Haha Wow Sad Angry News about Vishal Megamart Nagpur. Tax Issue on Chandaks Building. Not Paying Tax...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

News about Vishal Megamart Nagpur. Tax Issue on Chandaks Building. Not Paying Tax from Last 6 Years.

vishal mega mart

विशाल मेगामार्टची इमारत जप्त होणार:

नागपूर : पदभार ग्रहण करताच नेहरूनगर झोनचे नवे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. भांडे प्लॉट चौकात असलेल्या घनश्याम चांडक यांच्या मालकीची विशाल मेगामार्टची इमारत जप्त करण्याची नोटीस बजावली. मालमत्ता करापोटी त्यांना ६४ लाख कर भरावयाचा आहे. अनेकदा नोटीस बजावल्यावरही करभरणा न केल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.
चांडक यांची ही इमारत एअर प्लाझा रिटेल होडींग प्रा.लि (विशाल मेगामार्ट) यांना भाड्याने दिली आहे. या जागेचा कर २००८ पासून भरण्यात आलेला नाही. ३१ मार्च २०१४ पर्यंत मालमत्ता कराची सास्तीसहीत एकूण ६४ लाख एवढी रक्कम नेहरूनगर झोनला देय आहे. यासाठी कर निरीक्षक व करसंग्राहकांनी अनेकदा सदर ठिकाणी भेट देऊनही त्यांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्यामुळे मनपाच्या झोन क्र.५ अंतर्गत ही इमारत जप्त केली जाणार आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories