Marathi Movie Time done a great job on Box office. with successful earning on box office. check out the the box office collection of the movie and pictures of the Time Pass Marathi Movie. This movie already crossed the 10 crore on Box office. Box office Collection of Time Pass Marathi Movie.
दगडू आणि प्राजक्ता यांच्या टाइमपासची ५ दिवसात १० कोटीची कमाई
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर फारच धूम करतोय. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच चक्क पाच कोटींचा गल्ला जमवला होता. तर पाच दिवसातच या सिनेमाचा कमाईचा आकडा १० कोटींच्या (10 crore) वर गेलेला आहे आणि तो अजून वाढणार आहे हे आता जवळपास नक्की झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास २६० सिनेमागृहात ६८० शो अजूनतरी हाऊसफुल्ल जात आहेत. आजही सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांची भीड आपल्याला पाहायला मिळत आहे.
दगडू आणि प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावलेली दिसत आहे. याशिवाय ‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है…’, ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ…’ हे डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतायेत. या सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरली आहेत. ‘टाइमपास’चे सिनेमागृहातील प्रत्येक शो जवळपास हाऊसफुल्ल आहेत. महाराष्ट्रभर या सिनेमाला फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमाचे प्रेक्षकांनी तोंडभर कौतुक केले आहे. हा सिनेमा मराठीतील अनेक विक्रम मोडीत काढेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हलक्या फुलक्या विषयावरील सिनेमा तरुणाईला भुरळ घालत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.
Gallery –
Timepass (TP) 2014 Marathi Movie, The light-hearted love story has collected over Rs 10 crore in its opening weekend after releasing in 260 screens.