बटाट्या चे महत्व..




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Humans have been eating potatoes since at least 500 B.C., according to What’s Cooking America. In recent years, potatoes have been deemed a “fattening” food because of their color. The potato is an important source of energy. Most of the calories in the potato come from its carbohydrate content, nearly 90 percent. While you may be avoiding carbs because you associate them with weight gain. This article is will  tell you why potato is very important for your body metabolism.

How Many Carbs in a Potato

 स्वयंपाकातील सर्व भाज्यांमध्ये हमखास पसंतीचा तसेच भाजीला काहीच पर्याय नसला तरी अडचणीला धाउन येणारा बटाटा … तेव्हा हा बटाटा कसा निवडावा?, कसा टिकवावा?, कसा शिजवावा?, व कसा उकडावा ? हे सर्व विज्ञाना द्वारे कळतं, बटाट्याची भाजी अथवा पदार्थ हे सर्वांनाच आवडीचे असतात. भाज्यांमधून ‘क’ जीवनसत्वे मिळत असतं पण शरीर याचा साठा करून ठेऊ शकत नाही. आणि ते अन्नामधून रोजच्या रोज मिळवावं लागतं. या करीता रोज भाजी खाणं हे महत्वाच !

बटाटा निवडताना हाताला जड व घट्ट वाटला पाहिजे.त्याच्यावर फार डोळे असता कामा नये. त्यावर हिरवा रंग नको,  त्याचा एक सारखा रंग असायला हवा व हाताला गुळगुळीत वाटायला ह्वा.

बटाटा टिकवण्यासाठी ते नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता, यापासून दूर थंड व अंधाऱ्या जागेत ज्या ठिकाणी हवा खेळती असेल तेथेच ठेवावे.फ्रीज मध्ये बटाटे कधीच ठेवू नये. त्यामुळे त्यावर रासायनिक बदल होतात  व चव बदलते.

 बटाट्यात असणारे जीवनसत्व त्याच्या सालीखाली असते. त्यामुळे बटाटे कधीही साली सहित उपयोगात आणावे. ते वापरण्याची उत्तम पद्धत म्हणजे ते कुकर मध्ये उकडावे ते थेट पाण्यात घालून उकडू नये, त्यातील जीवन सत्वे पाण्यात निघून जातात. व त्यात पाणी शिरून चवही बदलते.  वाफेवर शिजवावे बुडात किंचित पाणी घालावे व त्यापूर्वीच बटाटे स्वच्छ घुवून घ्यावेत. बटाटे एकदा आणल्या नंतर आठ ते दहा दिवस टिकतात. पांढरट व पिवळट सालीचे बटाटे भाजी, रस्साभाजी, फिंगरचिप्स वै. साठी चांगले असतात. कारण  त्याचा भुगा होत नाही. फोडी सुटसुटीत राहतात. त्याउलट सूप साठी बेक्ड, मॉश्ड, कचोरी, थालीपीठ, चकल्या, साबुदाणा बटाटा वडा, कीस या साठी तपकिरी बटाटा चांगला  असतो .

बटाट्यातील ‘ब ६’  या मोठ्याप्रमाणात असलेले जीवन सत्व हे मेंदूच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असत. विशेषत: वृद्ध व्यक्तींना व मधुमेहींना त्याचा फार फायदा होतो. बटाटे जेव्हा वाफेवर उकळ्या जातात तेव्हा त्याच्या सालीखाली असणारी सर्व जीवनसत्वे त्यामध्ये शोषून घेतली जातात. यासाठी बटाटे शिजविण्यासाठी हि पद्धत उत्तम समजली जाते. कधी क्च्यां बटाट्याचे काही बनविण्यासाठी साल काढावीच लागते तेव्हा मात्र साल एकदम हलकी,पातळ काढावी. बटाटे अगदी चिरल्या बरोबरच वापरावे. बटाट्यामध्ये असलेल्या खनिजापैकी महत्वपूर्ण प्रमाण असलेली खनिजे म्हणजे पोट्यशिअम आणि म्यग्यनीज यांचा शरीराला उत्तम उपयोग होतो. पण हल्लीच्या संशोधनानुसार त्या मध्ये असलेल्या कुक्योअमाईन या रसायनाचा उपयोग रक्त दाबाची पातळी कमी करण्यासाठी होतो. बटाट्यात कार्बोहायड्रेटस खूप असतात. ट्रिप्टोफॉन हे अमिनो आम्ल आणि ‘ब ६’ यामुळे मेंदू मध्ये अशी चेताप्रसारके तयार होतात. ज्यामुळे नैराश्य दूर होते. शांत झोप लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात बटाटा अवश्य खावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu