पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी शशी थरुर यांना पाठवलेले पत्र
शशी थरुर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्या कथित संबंधाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. एका खासगी टीव्ही चॅनलने त्यांच्यातील इ-मेल सार्वजनिक केले आहेत. थरुर-तरार यांच्यातील हा मेल संवाद 28 जुलै 2013 मधील आहे.
मेहर तरार यांनी शशी थरुर यांना पाठवलेला मेल
तुमच्या आयुष्यात जे काही सुरु आहे त्याचे मला दुःख आहे. मला कल्पना आहे, की लग्न आणि पत्नीला तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. जेव्हा मी तुम्हाला शुक्रवारी प्रकाशित झालेल्या माझ्या लेखा विषयी विचारले तेव्हा तुम्ही चुकीने दुस-याच गोष्टींचा उल्लेख केला. मला त्याचे वाईट वाटले. कालच्या रात्री मला त्याबद्दल हसायला आले, कारण त्यावर काहीही लिहिण्याचे मला आश्चर्य वाटत होते. आपण दोनवेळा भेटलो आहोत आणि चांगले मित्र झालो. तुम्ही माझे मित्र असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. याआधी ट्विटर आणि माझ्या आर्टिकलमधूनही मी सांगितले आहे, की तुमची पुस्तके आणि राजकीय विचाराने मी प्रभावित झाले आहे. तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल विचारपूस केली त्यामुळे मी काही गोष्टींचा नव्याने विचार करु लागले आहे. तुमची सहजता, शालिनता आणि नैतिकता यामुळे मी अनेक गोष्टींचा नव्याने विचार करु लागले आहे. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद शशी… लांब राहाणारा मित्र.
काही गोष्टी अशा असतात ज्या लोकांना समजण्यास जड जातात. आयुष्य आपल्याला एका दिशेने जगण्याचे आणि जे आपण पाहू शकत नाही त्याबद्दल संशय निर्माण करण्याचे काम करते. अनेकदा लोकांमध्ये संवाद न झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. दुसरीकडे जग शंका घ्यायला लागते आणि सत्य कमकुवत होऊ लागते. मात्र, सरते शेवटी सत्यच उपयोगी पडते. शेवटी तुम्ही स्वतःवर विश्वास राहू द्या, तुम्ही अद्भूत आहात. इशांअल्ला, तुमच्या दोघांमध्ये नक्कीच तोडगा निघेल. माझ्यामुळे तुमच्या पत्नीच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला मी काय करु शकते. एवढेच काय माझी मुलं काय विचार करतील, याचादेखील मी विचार करु शकत नाही. एक पुरुष आणि एक महिला यांची मैत्री असूच शकत नाही, हा माझा विचार खरा होता, असेच मला वाटायला लागले आहे. लोक कायम या मैत्रीकडे वेगळ्या नजरेने पाहातात. लोकांचे जाऊ द्या, ती महिला, जिचे तुमच्यावर प्रेम आहे. तिच्याही मनात शंका निर्माण होईल. शशी, माझी दुवा तुमच्यासोबत आहे. तुमचे आयुष्य आणि लग्न सुखात राहावे.
मेहर तरार यांच्या मेलला थरुर यांनी दिलेले उत्तर
मेहर, तु ज्या पद्धतीने तुझे म्हणणे मांडले आहेस त्याबद्दल धन्यवाद. मला नेहमी भीती वाटत राहाते कारण, ज्या पद्धतीची आपली मैत्री आहे त्यावर सहजा सहजी विश्वास ठेवणे लोकांना जड जाते. अशी मैत्री असू शकते का, की केवळ ही माझी मनोधारणा आहे. आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हापासून आतापर्यंत फार कमी वेळात आपण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झालो आहोत. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे मात्र, तिचा माझ्यावर विश्वास नाही याचे दुःख होते. एवढेच काय सुनंदाने तर मला स्पष्ट सांगितले आहे, की मी तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही. सध्या तिच्यावरील ताण-तणाव कमी करणे ही माझी प्राथमिकता आहे. मला विश्वास आहे, की तु मला समजून घेशील. जर मी तुला फोन करणे आणि मेल करणे बंद केले तर, तु मला विसरून जा. तू माझ्यासाठी कायम एक चांगली मैत्रिण राहाशील आणि मला विश्वास आहे, तो दिवस लवकरच येईल. जेव्हा आपण तिघे एकत्र भेटू आणि आपल्यातील सर्व गैरसमज दूर होतील.