Journey of life is very long. To get salvation we need to work hard. Is not easy to get salvation from this life. Life is rung and round. Our soul never dies, it transfer into one body to other body. This article is based on salvation of life. Get place for you at God stage. Journey of life towards god.
प्रत्येक नर-नारींनी ब्रम्हरूप होण्याकरिता,सद् गती प्राप्त होण्याकरीता जीवन मुक्त होण्याकरिता, मुक्तिपद, मोक्षपद, अमरपद प्राप्त होण्याकरिता सो$हं मंत्राचा जप सतत करावा व याच स्मरणात प्राण सोडावा. सो$हं स्मरणात जे प्राण सोडतात त्या नरनारीं ची यमपुरी च्या नरकवासातून सुटका होऊन जन्म-मरणाचे तसेच चौर्यांशी लक्ष योनीचे यातनामय, दु:खमय फेरे चुकतात. मन हे आरशा प्रमाणे आहें. अनेक जन्मातील बऱ्या-वाईट संस्कारांनी “मनरूपी” आरसा मलीन झालेला आहे. तो साफ होण्याकरिता सतत सो$हं जप करावे. याच चिंतनाची तीव्र सवय लाऊन घ्यावी. म्हणजे अंतकाळीही सो$हं स्मरणाचा विसर पडणार नाही. कधी-कधी अंतकाळी वासनांचा अतिशय जोर असतो. त्या वासनांचा क्षय होण्याकरिता सो$हं नामाचे सतत तीव्र स्मरण आवश्यक आहे. तद्वत सो$हं च्या सतत नीजध्यासाने, स्मरणाने जीव-शिव रूप, ब्रम्हरूप, ज्योतिरूप होतो. आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून, भवव्याधीतून सुटतो. मानव देहातील जीवनयात्रा सुखरूप, सुखदायक, आन्नददायक होवून ते चिरंतर-अक्षय, अढळ मोक्षपदाला पोचतात.