Karmache Fal Marathi arcltie: Apne suna hoga Maa-Baap ke karmo ka Fal Beto ko milta hai, Lekin kabhi-kabhi Maa-Baap ke karmo ka Fal bachonko milta hai.
व्यक्ती आणि समाजाचा संपूर्ण सांगाडा खिळखिळा करण्यात त्याची परिणीती झाली. यातून भयानक असंतोष, अशांती, गुंतागुंत निर्माण झाली आहे. विधात्याला संतुलनाची चिंता असते. खेळ कौतुकाला कुटीलतेचे स्वरूप येते. तेव्हा दुसरी पावले ईश्वराला उचलावी लागतात.
जगन्नियंत्याने सुद्धा जगाचे व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी दोन माध्यमांचा वापर स्वत:च्या हातात ठेवला आहे. त्यामुळे पापी लोकांना पापकर्माची शिक्षा आणि आणि पुण्यवंतांना स्वर्ग सुखाचे रसास्वाद्न करावयास मिळते. शिक्षा प्रक्रियेचेच एक नाव महाकाळ आहे, तो शिक्षेची, दंडाची व्यवस्था करीत असतो. दुसरी बाजू संभाव्यतेची आहे. अनुशासनाने वागणारे, मर्यादांचे पालन करणारे, मानवोचितव्यवहार करणारे सुखाचे वाटेकरी होतात. अलंकारीत भाषेत यालाच परीस, कल्पवृक्ष, विश्वकर्मा म्हणतात. या तिन्ही नावाचे उद्दिष्ट एकच आहे; आणि ते म्हणजे कर्माचे फळ यथाकाळी प्रत्येकाला मिळतेच.
मागील जवळ जवळ दोन हजार वर्षात लोकांनी विशेषत: शक्तिशाली वर्गाने आपली शक्ती-क्षमता, अनीती, अन्याय, दुष्टपणा यातच खर्च करीत आहेंत. त्याचे फल आमच्या समोर आहे. बहुतेक जण शारीरिक, मानसिक व्यथेने पिडीत आहे. क्षमतेच्या दुरुपयोगाने दारिद्र्याला आम्ही पाचारण केले. कुटील व्यवहाराने समाजात द्वेष-कलहाचे बीजारोपण केले. बहुदा पापात्म्यांना जी दशा भोगावी लागते त्या दैवी संकटांचा सामना करण्याची पाळी आमच्यावर ईश्वरीय नियममर्यादांचा भंग केल्याने आलेली आहे. निंदा, नालस्ती, अप्रामाणिकपणा, अविश्वास, अपघात वै. अनर्थांला अशाच लोकांना बळी पडावे लागते. ज्या काळात अनाचाराचे प्रस्थ वाढते त्या परिस्थितीलाच कलियुग या नावाने संबोधले जाते. दुष्ट कर्मरत लोकांना त्यांच्या दुष्टपणाची शिक्षा तर मिळतेच; पण मूकपणे अन्याय, अत्याचार बघणारे, आत्मसंरक्षण न करू शकणारे लोक सुद्धा कर्तव्यहीनता, असामाजिकता आणि भीती याकारणाने त्याच वर्गात जमा होतात. मागील दोन सहस्त्राब्दीत सत्ताधारीवर्ग, धर्मपदेशक, श्रीमंत, कलाकार आणि चतुर्वर्ग यांनी धुर्ततेने वागण्यात यकिंचितहि उणीव ठेवलेली नाही. या कारणाने अत्याचाराचे प्राबल्य वाढलेले आहे. कोसळणाऱ्याला कोसळू देणे हे मूकदर्शकाचे बेजबाबदारीचे काम आहे. यांवर ईश्वर रुष्ट असतो. कारण भगवंत तसा नाही.
Karmache Fal Marathi article.