नवीन वर्षात इन्फोसिसमध्ये नोकरीची एक खूप चांगली संधी तरुणांसमोर चालून येत आहे. नवीन वर्षात इन्फोसिसमध्ये तब्बल १६ हजार जागांची भरती होणार आहे. त्यामुळे आय टी, इंजिनिअरिंग कॉम्पुटर चे शिक्षण घेतलेले आणि घेत असलेल्यांना विद्यार्थांना एक उत्तम संधी निर्माण होणार आहे.
नोकरीसाठी सर्व उमेदवार पदवी घेतलेले आणि नवे पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणारे असणार आहेत. इन्फोसिसचे अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिलीय. नारायण मूर्ती म्हणाले, `पुढील वर्षासाठी कर्मचारी घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तरीही एकूण १५ हजार ते १६ हजार माणसांची कंपनीला आवश्याकता आहे.
आज भारताचा आयटी उद्योग १०८ अब्ज डॉलरचा आहे. त्यातच आता अमेरिका आणि युरोप इथून कामं आऊटसोर्स करण्याचं प्रमाण हळूहळू आपल्याकडे वाढतंय. अमेरिका आणि युरोपमधून देशाच्या आयटी उद्योगाच्या एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न तयार होतंय. या दोन्ही प्रदेशांतील परिस्थिती आऊटसोर्सिंगसाठी अनुकूल बनत असल्यानं मागील वर्षापेक्षा आगामी वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे.
या पार्श्वकभूमीवर एकंदर विकासाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची दखल घेऊन विकासासाठी देशानं खंबीर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.Infosys Careers – Information Technology Careers & Job Opportunities, Infosys is an Indian multinational provider of business consulting, information technology, software engineering and outsourcing services.