भारतीय संस्कृतीत घराचे व वास्तुशास्त्राचे महत्व ?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Importance Of Home in Indian Culture, The Indian culture, often labelled as an amalgamation of several cultures, spans across the Indian subcontinent and has been influenced by a history that is several millennian old.

भारतीय संस्कृतीत घराचे व वास्तुशास्त्राचे महत्व ?

भारतीय संस्कृतीत घराचे व वास्तुशास्त्राचे महत्व ?

घर म्हणजे नुसत्या मातीच्या किंवा सिमेंट विटाच्या भिंती नकोत. तसे तर घरात भिंती असाव्यातच कारण त्याशिवाय तर घर पूर्ण होऊच शकत नाही, पण घरात भिंतीशिवायाही अधिक काहीतरी असावे लागते. घरात भिंतीची आवश्यकता का ? तर भिंतीमुळे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून आपल्याला  संरक्षण मिळावे म्हणून घरात भिंती असणे आवक्श्यक आहे. आपल्याला हक्काचा निवारा मिळावा, घरात सुरक्षितता असावी, म्हणून मानवाने अगदी प्राचीन काळापासूनच असा प्रयत्न केलेला आढळतो. जसे कि झाडाच्या खोडात असलेली ढोल किंव्हा एखाद्या डोंगरातील गुहा, फांद्या काटक्यांनी बांधलेली झोपडी, दगडांचे घर, विटांचे बांधकाम व आता सिमेंट क्रॉंक्रीटचे घर, असा बदल आपल्या घराच्या रचनेमध्ये होत गेला असेल. पण अगदी प्राचीन काळापासून घराची कल्पना तीच.

स्वतःच्या किंवा आपल्या घरातील लोकांच्या सुरक्षेसाठी असा निवारा आवश्यक आहे हे जाणवल्यानंतर त्यावर अधिकाधिक विचार केला गेला. आणि मग पुढे त्या विचारातून एक वास्तुकलाच निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे. नंतर पुढे त्याचे वास्तुशास्त्र बनले. त्यात प्रामुख्याने जमीन, भिंती, दारे, खिडक्या इत्यादींचा विचार केला जात असला, तरी त्यातील मूलभूत जो विचार आहे तो त्या घरात राहणाऱ्या लोकांना सुख लाभावे हाच आहे. म्हणून माणसाने या सुंदर सृष्टीतील निसर्गनिर्मित वस्तू घेऊन आणि त्यावर संस्कार करून निवारा तयार केला. पण त्यामुळे निसर्गातील चल-अचल, जड-चेतन, दृश्य-अदृश्य असे जे सर्व घटक आहेत त्यांनी परस्परावलंबिता, त्यांचे परस्परांतील संबंध ध्यानात घेऊन त्याला आपल्या या कृत्रिम निर्मितीने बाधा येणार नाही, हा विचार माणसाने करायला हवा आहे.

घर ही माणसाची मुलभुत गरज असल्याने वास्तुशास्त्राची प्रगती सुद्धा झपाट्याने झाली. आपल्या जगाच्या इतिहासात भारताबरोबरच इतर काही संस्कुती सुद्धा विकास पावल्या. पण त्या अल्पजीवी ठरल्या. त्यामुळे या विषयावरही भारतातच अधिक ग्रंथनिर्मिती झालेली आढळते. त्याचे प्रत्यय आपल्याला या ग्रंथांमधून मिळते, विश्वकर्मीय शिल्प, मानसार वास्तुशास्त्र, विश्वकर्मप्रकाश आदी वास्तुकला ग्रंथाबरोबरच बृहत्संहिता, स्कंदपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण, तंत्रग्रंथ यांतही या संबंधीचे विवेचन करण्यात आलेले आहे.

आपली पृथ्वी ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. असे पुराणात नमूद केलेले आहे.ज्याप्रकारे हि पृथ्वी हि पंचमहाभूतांपासून बनलेली आहे त्याच प्रकारे माणसाचे शरीर सुद्धा पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. त्यामुळे वास्तुरचनेतही या पंचमहाभूतांचा विचार केला गेलेला आहे. चराचर सृष्टी, मानवी शरीर व वास्तू यांच्यात समतोल व सुसंवाद साधला जाईल, अशी वास्तुरचना विचारपूर्वक आखली गेलेली आहे. आपल्या वास्तुरचनेत सूर्यप्रकाश, वाऱ्यांची दिशा, जमिनीचा उतार, घरासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र, मातीचा प्रकार, पृथ्वीचे चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण आदी सर्व गोष्टींचा अभ्यास  करून हि वास्तुरचना बनविण्यात आली आहे.

आपल्या वास्तुरचनेत सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता यांचाही योग्य विचार करण्यात आला आहे. त्याचे प्रत्यय आपल्याला जागोजागी येत असते. जसे कि आपल्या घराच्या मुख्य वास्तूत एकदम प्रवेश नसतो हे स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे, म्हणून कुंपणभिंतीपासून मुख्य इमारत हि नेहमी आत असते, आधी ओटी असावी. मगच दिवाणखान्यात प्रवेश होतो. स्वयंपाकघर स्वतंत्र असावे. शक्यतो स्वयंपाकघर व जेवणघर एकच असावे. ईशान्य दिशेला स्वतंत्र देवघर असावे, आग्नेयेकडे चूल असावी, बाळंतिणीची खोली स्वतंत्र असावी. संडास लांब असावेत. सांडपाण्याच्या नाल्या झाकलेल्या असव्यात अश्या कितीतरी गोष्टींचा उल्लेख आपल्या वास्तुरचनेत आपल्याला आढळतो.

या वास्तुरचनेत पर्यावरणाच्या विचारही झाला. स्वावलंबी जीवनासाठी भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती लावण्यासाठी घरासमोर मोकळी जागा असावी. पूर्वेकडे कमी उंचीची झाडे लावावीत. घरामध्ये तुळशी वृंदावन असावेच. केळी, आळू, तोंडली यांसारखी सतत पाणी लागणारी झाडे स्नानगृहाचे पाणी जात असेल, तेथे लावावीत अश्या प्रकारची माहिती आपल्या वास्तुरचनेत सांगितली गेली आहे.

घर नुसते उभे केल्यानी चालत नाही तर तिच्यावर तांत्रिक संस्काररांबरोबरच आध्यात्मिक संस्कार केल्यानंतरच तिला खरे ‘ घरपण ’ प्राप्त होते व मगच त्यापासून आपल्याला शुभफळे मिळतात. असा भारतीयांचा विश्वास आहे. म्हणून आजही आपल्यात वास्तुशांतीची प्रथा सुरू आहे. प्रत्येक वास्तूमध्ये एक अदृश्य शक्तीचा वास असतो. तिचा बरावाईट प्रभाव त्या घरात राहणाऱ्यावर पडत असतो; याचा अनुभव आपल्याला सतत येताच असतो. जसे कि काही ठिकाणी आपल्याला प्रसन्न वाटते तर काही ठिकाणी मनात उगाचच भय निर्माण होते. हे भावनिक असते असे म्हणता येणार नाही. कारण एखाद्या वास्तूत प्रवेश केल्याबरोबर वाढलेला श्वसनाचा वेग आपल्याला मोजताही येऊ शकतो. अशी वास्तू सदोष समजतात. दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास रक्ताभिसरनावर परिणाम होतो. हृदयाची स्पंदने अनियमित होतात. छातीत धडधडते, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. म्हणूनच झोपायच्या खोलीची रचना याचा विचार करून बनवावी लागते.

ज्या वेळी जागा भरपूर होती – निवडीची संधी मिळत होती, तेव्हाची गोष्टच वेगळी होती, असे आज वाटणे स्वाभाविक आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, शहरीकरण यामुळे मिळेल त्या जागेवर, बांधता येईल तसे घर हीच कल्पना मुख्यतः आहे. फ्लॅट पद्धतीत तर आपल्य निवडीला काहीच संधी नसते. तरीही आजकाल घराची अंतर्गत रचना करीत असताना वस्तुशास्त्राचा थोडाबहुत विचार करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. या घराच्या भिंती आपल्या हातात नसल्याने अंतर्गत सुशोभन फक्त मनासारखे करता येते. पण त्यातही फारशी संधी मिळेलच असे नाही. कारण लहान जागा – सर्वांच्या सारख्याच आवश्यकता. त्यामुळे पुष्कळदा तोचतोपणा दिसतो. अन तरीही घराच्या दर्शनाने घरातील माणसांच्या स्वभावाचा, त्यांच्या आर्थिक स्थितीचा, घरातील सर्वांच्या व्यवस्थितपणाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा अंदाज आपल्याला येतोच.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu