स्वप्नातील जग कॉलेज आणि आजचे आईवडील




Like
Like Love Haha Wow Sad Angry

I Miss My College Days, Expect to be separated from your parents at some point. It’s true: at some point during move-in day, you actually will have to be

collage days

स्वप्नातील जग कॉलेज आणि आजचे आईवडील
१२ वि पर्यंतचे माध्यमिक शिक्षण संपले कि लगेच आपल्याला नि आपल्या आई वडिलांना ओढ लागते ती म्हणजे कॉलेजची. आपल्या पेक्षा हि जास्त ओढ असते ती आपल्या आईवडिलांची. कारण त्यांना जो आनंद होतो तो केवळ त्यांनाच ठाऊक असते. कारण आपण आता मोठे झालेलो असतो.
खरच हे वयच फार वेगळे असते. या वयात ओढ असते ती कॉलेज मध्ये जाण्याची. कारण विश्वच फार वेगळे असते. पण कॉलेज म्हणजे नेमके काय.
कॉलेज म्हणजे मुलामुलींचे एक वेगळेच विश्व. ज्यात तुरुनांचे एक वेगळेच विश्व तयार होत असते. कॉलेज मध्ये आपल्यासाठी एक मुक्त प्रांगण स्वतंत्र व्यासपीठ तयार होत असते. जिथे आपल्यावर कुठल्याही प्रकारची बंदी नसते. कुणाचीही मक्तेदारी आपल्यावर चालत नाही. जिथे मनमुरादपणे आपण आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगू शकतो. फुलापाखारांसारखे बागडू शकतो. या कॉलेजच्या दिवसात आपण एका स्वप्नांच्या जगात वावरत असतो. पण नेमक आपण त्या वेळी विसरत असतो कि आपण नुकताच या स्वप्नांच्या जगात प्रवेश केलेला आहे. या नव्या जगात वावरण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांनी भरपूर स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणून काही त्याचा आपण दुरुपयोग करू नये. पण आज आपण नेमके तेच करतो आहे. आणि त्याचा मनस्ताप अनपेक्षित पाने आपल्याच आईवडिलांना होतो आहे. आणि हे आज आपल्याला काळात नाही हेच आपले दुर्भाग्य आहे.
आज या स्वप्नाच्या जगात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असते कि आपल्याजवळ एक गाडी असावी, आपण चांगल्या ब्रांडचे कपडे घालावे, गॉगल्स, शुज्स, स्यानडलस, महागडे मोबाईल फोन असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. नेमके आज कॉलेज म्हटले कि या स्वप्नाळू जगाच्या मुलभुत गरजा झालेल्या आहेत. जशा आधी माणसाच्या मुलभुत गरजा होत्या त्या अन्न, वस्त्र, निवारा तशाच आता कॉलेज मध्ये जायचे आहे तर या गरजा पूर्ण करणे आवक्श्यक झालेले आहे. पण आज आपण हे विसरलो आहे कि स्वप्नातलं जग आणि वास्तविक जगात खूप अंतर आहे. पण हे सुद्धा आपल्याला समजत नाही. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आईवडिलांकडे राडा लावत असतो. आणि आपले आईवडील आपल्या जीवाचा आटापिटा करून त्या गरजा पूर्ण करतात. पण ते त्या कशाप्रकारे पूर्ण करतात याकडे आपण कधीच लक्ष देत नसतो. कारण आपल्याला त्याच्याशी काहीही देणघेण नसते. आपल्यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे आपल्या मुलभुत गरजा पूर्ण होणे. आणि मग त्या पूर्ण झाल्या कि आपल्या गरजा अजून वाढत जातात नंतर मोबाईल फोन ची जागा घेते ते स्मार्ट फोन, ल्यापटोप हेही आता आवश्यक झालेले आहे, त्यासाठी मग अजून आपण राडा लावणे सुरु करतो. मग त्यह्हि गरजा पूर्ण झाल्या कि मग आपले मन अजून आपल्याला सांगत असते कि अजूनही आपण काही परिपूर्ण झालेलो नाही. मग शोध सुरु होतो तो सुंदर मैत्रीण आणि मित्र बनविण्याचा. पण या सर्वात आपण हे विसरून जातो कि आपले नेमके ध्येय काय. आपण कशासाठी या स्वप्नांच्या जगात प्रवेश केला होता. कारण या सर्व जगमागतात आपल्या ते लक्षातच येत नाही. आणि आपण या स्वप्नाच्या जगात भरकटत जातो. आणि भरकटत कुठे जाऊन थांबतो ते काही केल्या आपल्याला समजत नाही. तसे तर कॉलेज मध्ये आपल्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळत असते. त्याचे ते एक अनुभाव्विश्व्च आहे. तिथेच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडले जातात. कॉलेज हाच तो बेस आहे ज्यावर आपण आपले आयुष्य घडू शकतो. म्हणून आपण आपल्या व्यक्तीमत्वात लपलेल्या प्रतिमेला ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करून पुढे न्यावे. आपल्या आशा आकांक्षा या स्वप्नारूपी कॉलेज मधेच तयार होत असतात. म्हणून आपण बाकी गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांना वाव द्यावा व आपले आयुष्य सुकर बनवावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu