China India relations, The resultant growth in China and India’s international diplomatic and economic influence has also increased the significance of their bilateral relationship.
भारत आणि शेजारी चीन
भारत आणि चीन यांच्यात झालेले १९६२ सालचे युद्ध आणि त्यात झालेला आपला पराभव हे तर आपण कधीही विसरू शकणार नाही. भारत ची युद्धाला ४८ वर्ष उलटूनही आपण ते विसरू शकलो नाही. भारताच्या प्रतीष्टेला लागलेला हा डाग अजूनही पुसला गेलेला नाही. पण त्यावेळचे हे युद्ध केवळ भारत चीन सीमाप्रश्नावर आधारित नव्हते तर ते आशियाखंडात कोण जास्त शक्तिशाली आहे हे ठरविण्यासाठी झालेल्या प्रयत्नाचा पहिला भाग होता.विसावे शतक हे सर्व जगातच स्वातंत्र्याचे शतक होते. अनेक देश हे कुण्या नाही कुण्या देशाच्या गुलामगिरीतून मुक्त झाले होते. आणि त्यांनी नुकताच स्वातंत्र्याचा श्वास घेतला होता. भारत आणि चीन या देशांचे पण असेच होते ते सुद्धा मागे पुढे स्वतंत्र झाले होते. परंतु या शेजारी देश्याच्या फार अवाढव्य सीमा ठरवल्या त्या त्यांच्यावर राज्य करणाऱ्या देशांनी. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तर चीन १९४९ मध्ये स्वतंत्र झाला. १९४९ मध्ये स्वतंत्र झालेल्या चीनने लगेचच आपल्या देशाच्या सीमेची पुनर्चना करायला सुरवात केली. त्यासाठी चीनने त्यांचे शेजारी असलेले भारत, पाकीस्थान, नेपाल, म्यानमार बोलणीही सुरु केली. चीनची हि बिळणी केवळ सीमाप्रश्नावर आधारित नव्हती तर ती आपला गेलेला भूभाग परत मिळविण्यासाठी चालू असलेली त्यांची धडपड होती.
मात्र त्यावेळी भारताने चीन आणि पाकीस्थान यांना फार गांभीर्याने घेतले नाही. चीन हा कधी भारतावर हल्ला करेल असा विचारही त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी केला नव्हता. प्रचंड हिमालयाची भिंत आपली सुरक्षा करण्यास समर्थ आहे असे त्यांना वाटत होते. पंडित नेहरूंनी कधीही चीनच्या धोरणांचा व त्याच्या लष्करी क्षमतेचा विचारच केला नाही. राजनैतिक पातळीवर नेहरूजी नेहमीच कमी लेखात राहिले आणि शेवटी त्याचाच परिणाम युध्याच्या रूपाने आपल्या समोर उभा राहिला. आणि आपल्याला आपल्याच भागातून माघारी परतावे लागले.
आपल्या या कमकुवत प्रतीकारामुलेच चीन भारताला कमकुवत समजला हा काही त्यांचा दोष नाही , तर हा दोष आहे तो आपल्या दूरदृष्टी नसलेल्या महान नेत्यांचा. पण या भारताच्या नमतेपनचि सुरवातही नेहरुजीनी १९५१ मध्ये घातली होती. भारत आणि चीन यांच्यात “बफर स्टेट” म्हणून असलेले तीब्बेत चीनने काबीज केले तेंव्हा त्याची जबाबदारी हि भारतावर होती त्यावेळी भारताने आपले हात वर केले होते. त्यावेळी नेहरुजीना चीनच्या पुढील चालीचा मग घेत आला नाही. चीनला विरोध न करता त्यावेळी त्यांनी फक्त दलाई लामा यांना केवळ भारताच्या भूमीवर आश्रय तेवढा मात्र दिला होता. १९५९ मध्ये तीब्बेत मध्ये झालेले बंडहि त्यावेळी चीनने अतिशय क्रूरपणे मोडून काढले. त्यावेळी सुद्धा पंडित नेहरू शांत बसले.
शेवटी पंडित नेहरूंनी १९५४ साली चीन सोबत तीब्बेत प्रश्नावर करार केला आणि शांतीपूर्वक परस्पर सहकार्याची पंचशील तत्वे जाहीर केली. पण हिच पंचशील तत्वे म्हणजेच भारताचा दुबळेपणा आहे असा समाज चीनने गृहीत करून घेतला.कारण त्यावेळी पंडित नेहरुंना विश्वाचे नेते होण्याची आस लागली होती. आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचा एकाच मार्ग होता तो म्हणजे शांतीचा मार्ग. आणि भारताचा त्यातच घात झाला. पंचशील तत्व म्हणजे परस्परांचा आदर करणे, शांततापूर्वक एकमेकांचे अस्तित्व, एकमेकांच्या भानगडीत नाक न खुपसणे हि त्यातली काही महत्वाची तत्वे आहेत. नेहरूंनी या नंतर याच तत्वांचा प्रचार करीत नंतर झालेल्या आफ्रो आशियाई एकात्मता चळवळीत आणि बंदुगाला झालेल्या तटस्थ देश्याच्या परिषदेतही सदर केली. याच तत्वांच्या भरवशावर त्यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील सुरु असलेल्या शीतयुद्धात इतर देशांचा मिळून एक तटस्थ गात निर्माण केला. आणि ते त्याचे एक महत्वाचे नेते बनले. चीनचे नवे नेतेही नेहरुजीनीच जगापुढे आणले. “हिंदी चीनी भाई भाई हि घोषणाही त्यांनी त्यावेळी दिली”.
पण नेमके त्याचवेळी चीनचा हुकुमशहा माओ यांना मात्र जगापुढे नेहरुजींचे वाढते वर्चस्व खुपत चालले होते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये चीनच सर्वात बलशाली आहे असा त्याचा समज होता. चीनचे महत्व कुणीही डावलू नये असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने भारताशी सीमाप्रश्न उकरून काढून भारतालाही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या दूरदृष्टीच्या अभावाने आपल्याला माओ किंवा चीनचा हा प्रयत्न समजलंच नाही. हिंदी चीनी भाई भाई या घोशनेतच आपण मग्न राहिलो. किंवा जगाचे नेते बनण्याच्या स्वप्नच आपण पाहत राहिलो. आणि तिकडे चीन मात्र आपले लष्करी सामर्थ्य अधिक बळकट करीत राहिला. चीन स्वतः तर आपले सामर्थ्य वाढवत होताच पण तिकडे तो पाकिस्तानलाही आर्थिक, लष्करी अशा प्रकारची सर्व मदत करून त्याला भारत विरोधी भडकावीत होता. आणि त्यामुळेच फालानिनंतर आतापर्यंत भारत पाकिस्तान यांच्या तीन युध्ये होऊन गेली आहेत. या युद्धात पाकला झालेला शस्त्रपुरवठा हा चीननेच केलेला होता. त्यामुळे भारताला आपले बहुतेक सैनिक हे पाक सीमेवर तैनात करावे लागले असे. आणि त्याच गोष्टीचा दुरुपयोग इकडे चीन भारत चीन सीमेवर करीत होता. तो हळू हळू आपले वर्चस्व या सीमेवर वाढवत होता. तर इकडे चीनने भारताचा प्रभाव हि मर्यादित करायला सुरवात केली होती. तिकडे नेपाल आणि म्यानमार यानाही चीनने आपल्या बाजूने ओढण्यास सुरवात केली होती. कारण त्याला आता भूतान आपल्या घशात घालायचा होता. तिकडे तो नेपाल आणि म्यानमार ला सर ती मदत करीत होता. नेपाळमधील सर्व पायाभूत सुविधा ह्या चीनच्याच मदतीने झालेल्या आहेत. चीनने म्यानमारमध्ये तळ उभारून हिंदी महसगरतही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पाकिस्तानामाधेही चीनचे लष्करी तळ बांधणीचे काम सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर इकडे श्रीलंकेतही एलटीटीएच्या संघर्षात चीनने श्रीलंकेला लागेल टी मदत केलेली आहे. चीनने भारताच्या सर्व शेजार्यांना आपल्या हाताशी करून भारताला अशांत कसे ठेवावे याचे संपूर्ण नियोजन केलेले आहे. भारताला सध्या तरी या उपखंडात मर्यादित कसे ठेवता येईल हा सर्व अभ्यास त्यांनी करून ठेवला आहे.
आज प्रत्येक शेत्रात चीनने भारतावर मत केल्याचे दिसून येत आहे. चीनची उधीस्ठे हि स्पष्ट आहेत. त्यांना सर्वात श्रीमंत व सामर्थ्यवान देश बनायचे आहे. त्यांनी हे उधिष्ट जवळपास पूर्ण केलेले आहे. त्यांच्या ध्येयाच्या मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांनी या न त्या प्रकारे दूर केलेल्या आहेत. त्यांनी यासाठी जागतिक पातळीवर कधी अमेरिका तर कधी रशिया या देशांचा हात पकडन्यासही मागे पुढे पहिले नाही. आर्थिक विकासासाठी त्यांनी हवे ते केलेले आहे. त्यासाठी चीनने पंडित नेहरूंची पंचशील तत्वे हि अंगिकारली. पण ती वेगळ्या अर्थाने. पण याचा अर्थ असा नाही कि आपण आता शांत बसणार आहोत. तटस्त राष्ट्रांच्या काळात तयार झालेली चाबी पुसून आता भारतही आपला स्वतःचा एक गात तयार करतो आहे. त्यासाठी अमेरिकेशी झालेला अणुकरारही फार महत्वाचा आहे. शिवाय आपले रशियाशी असलेले जुने संबंद हि आज टिकून आहे. त्याचवेळी फ्रान्स, इंग्लंड, ब्राझील या देशानाही आपल्याकडे वळवून घेण्याचा भारताचा पर्यंत चालूच आहे. त्यामुळे १९६२ मधील भारत समजून आता चीनने ती आगळीक करायला नको. कारण आता आपण लष्करी, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या आधीपेक्षा अधिक बलवान झालेलो आहे. हे चीनने कधीही विसरता कामा नये.